
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी -श्री.रमेश राठोड.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
आर्णी (ता.प्र.) येथील आर्णी तालुका काँग्रेस, युवक काँग्रेस व महिला कॉंग्रेस कमिटी यांच्या वतीने महागाई, बेरोजगारी, अग्निपथ, व जी. एस. टी च्या विरोधात व तालुक्या अतिवृष्टीमुळे झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने आर्णी तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यांवी या मागणीसाठी रस्त्यावर बसुन आर्णी येथील शिवनेरी चौकात काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी मा.जितेद्र मोघे उध्दवराव भालेराव, आरीज बेग, छोटु देशमुख, अनिल आडे, डॉ.रामचरण चव्हाण यादवराव राठोड बाळासाहेब शिंदे, अमोल मांगुळकर, विजय मोघे,, संजय शिरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मोदी सरकार व राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध केला. व नंतर पुतळा जाळण्यात आला.या धरणे आंदोलनात अविनाश चव्हाण, आरीज बेग, सुनिल भारती,राजु विरखेडे, अँड. प्रदिप वानखडे, छोटु देशमुख, बाळासाहेब शिंदे, अनिल आडे, अमोल मांगुळकर, खुशाल ठाकरे, नरेश राठोड,संजय राऊत, अतुल देशमुख, निलेश आचमवार, गुणवंत राऊत, पंडीत बुटले,गुणवंत राऊत, विजय राऊत, अविनाश भाऊ भगत सतिश देवस्थळे, शंकर राठोड, नांलदा भरणे, तुळशीराम मोरकर, अंगत अरणकर, ज्योती अंरणकर, भाऊ सुरटकर यांच्यासह आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.