दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर
हिन्दी विभाग आयोजीत अमृत महोत्सवानिमित्त म . फुले महाविघालयाच्या राष्ट्रीय ऑनलाईन चर्चासत्राचे उद्घाटन
भारतीय स्वातंत्र्याचा प्राचीन इतिहास गौरवशाली असून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारताने स्वतः ला सिद्ध करून जगाला मार्गदर्शन केले आणि आमची आस्था अस्मिता स्वाभिमान जोपासला असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांनी अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि महात्मा फुले महाविद्यालय किनगाव च्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त हिंदी विभागाच्या वतीने राष्ट्रीय ऑनलाईन चर्चासत्राच्या (संगोष्ठी ) प्रसंगी दि 5 ऑगस्ट रोजी *स्वतंत्रता आंदोलन और राष्ट्रीय काव्यधारा* या विषयावर संपन्न होत असलेल्या ऑनलाईन उद्घाटनात बोलताना प्रतिपादन केले या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे *प्राचार्य डॉ बबनराव बोडके* होते तत्पूर्वी या राष्ट्रीय चर्चासञाचे चे प्रस्ताविक हिन्दी विभागाचे प्रा डॉ विरनाथ हुमनाबादे यांनी केले त्यावेळी उद्घाटनपर पुढे बोलताना डॉ बिसेन म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य 1947 ला जरी मिळाली असलले तरी सांस्कृतिक दृष्टीने भारताने आपले अस्तित्व प्राचीन काळापासून जपले आहे ब्रिटीशाच्या जुलमी राजवट सोबतच हैदराबादच्या निजाम आणि रजाकाराने मराठवाड्यातील जनतेवर अन्याय अत्याचार केला तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीत महापुरुषांनी आणि साहित्यिकाने काव्यरूपी रचनेतून, साहित्यातून चेतना जागृत करून जनजागरण करत राष्ट्राची, एकता , अखंडता आणि अस्मिता जपण्याचे महान कार्य केले असे मत मांडले त्यानंतर अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ बबनराव बोडके यांनी केला मार्गदर्शनपर द्वितीय सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा डॉ रणजीत जाधव लातूर उपस्थित होते तर दिल्लीच्या स्वामी श्रद्धानंद विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ टेक चंदजी यांनी राष्टीय ऑनलाइन चर्चासत्रात सहभागी होऊन मार्गदर्शन केले यावेळी मार्गदर्शन करताना प्रोफेसर डॉ टेक चंदजी म्हणाले की स्वातंत्र्यपूर्व भारताची अवस्था दयनीय होती काव्यलेखन आणि वर्तमान पत्राच्या माध्यमातून जनतेमध्ये नवचेतना निर्माण करण्याचे कार्य साहित्यिक कवी, लेखक यांनी केले त्यांच्या विस्तृत कार्याचे योगदान ही सांगीतले त्यानंतर अध्यक्षीय समारोप प्रो डॉ रणजीत जाधव यांनी केला
या राष्ट्रीय आँनलाईन चर्चासञात एकूण 314 प्राध्यापक , शोधकर्ता विद्यार्थी यांनी सहभाग घेऊन मार्गदर्शनाचा लाभ घेतला
या राष्ट्रीय चर्चासञासाठी महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख तथा संयोजक प्राचार्य डॉ बबनराव बोडके, सह संयोजक हिंदी विभागा चे प्रा डॉ विरनाथ हुमनाबादे ,नॅक मुल्याकन समितीचे समन्वयक तथा तांत्रिक सहाय्यक प्रा डॉ प्रभाकर स्वामी सहाय्यक प्रा लक्ष्मण शिरसागर प्रा संतोष पवार , प्रा डॉ विठ्ठल चव्हाण , प्रा बालाजी आचार्य यांनी परिश्रम घेतले सुञसंचालन प्रा संतोष पवार, प्रा लक्ष्मण क्षिरसागर यांनी केले तर शेवटी आभार प्राचार्य डॉ बबनराव बोडके यांनी मानले राष्ट्र गीताने राष्ट्रीय चर्चासत्राची सांगता झाली
