
दैनिक चालू वार्ताप्रतिनिधी सातारा- संभाजी गोसावी
नुकतेच नव्यांने पदभार स्वीकारलेले सातारा जिल्ह्यांचे नवयुक्त जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी हे सकारात्मक, स्वभावाचा हा माणूस झोकून देवुन काम करण्यांची मानसिकता बाळगून आहे. जिल्ह्यांतील अनेक प्रश्नांसोबत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनांचा प्रश्नं त्याचबरोबर अजेड्यावर आहे.याचबरोबरच संपर्क नसल्यांमुळे थांबणाऱ्या पर्यटनांच्या संधी निर्माण करण्यांचे त्यांचे नियोजन आहे प्रचंड आशावादी असलेला रुचेश जयवंशी यांनी दैनिक चालू वार्ताशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रश्न. सातारा जिल्हाधिकारी आपली काय भावना आहे. उत्तर सातारा जिल्हा हा निसर्गसंपन्नतेने नटला आहे. या ठिकाणी चांगला निसर्ग लाभल्यांने पर्यटनांच्या दृष्टीने अनेक संधी आहेत. महाबळेश्वर सारखे ठिकाण हे या सातारा जिल्ह्यांत आहे त्यामुळे जिल्ह्यांत येणाऱ्या पर्यटकांची अधिकधिक चांगली व्यवस्था करण्यांचे नियोजन करणार आहे. काही पायाभूत सुविधा तयार कराव्या लागतील. कास आणि महाबळेश्वर यांची कनेकटीव्हिटी करणाऱ्या वर भर देणार. प्रश्न.या ठिकाणच्या समस्या बाबत काय सांगाल उत्तर तशा समस्या सर्वच ठिकाणी असतात त्याचे स्वरुप वेगळे असते मी खूप अडचणीच्या ठिकाणी काम केले आहे. त्यामुळे सातारा जिल्हा तसा चांगला आहे या ठिकाणी काही समस्या असल्या तरी त्या सोडविण्यांची माझी तयारी आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात चांगला समन्वय असेल तर अधिक चांगली कामे होतात . यासाठी आम्ही प्राधान्यांने पुढाकार घेणार आहोत. लोकप्रतिनिधी ना ही चांगली कामे व्हावीत असे वाटतं असते सध्या मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्यांतीलच आहेत. त्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून मिळालेल्या संधीचा चांगला उपयोग सातारा जिल्हावासियांना नक्कीच होईल अशा आपल्या भावना नवयुक्त जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दैनिक चालू वार्ताशी बोलताना दिल्या.