
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम – आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या स्थानिक विकास निधीतून(५ लक्ष रुपये ) बांधण्यात येत असलेल्या पाथरुड येथील महादेव मंदिराच्या सभामंडप कामाचे भूमिपुजन माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने संजय गाढवे यांचा सत्कार करण्यात आला.या सभागृहामुळे ग्रामस्थांना विविध धार्मिक ,सांस्कृतिक कार्क्रमांसाठी सोयीचे होणार असल्याने यावेळी आ.तानाजी सावंत यांचे ग्रामस्थांतून आभार व्यक्त करण्यात आले .यावेळी पं.स.चे मा.उपसभापती रामकिसन गव्हाणे,वैजिणाथ म्हमाणे, भाजपचे तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, दत्तात्रय गायकवाड,निलेश चव्हाण,प्रा.तानाजी बोराडे यांच्यासह सर्व ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.