
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-नागपंचमीच्या सणानिमित्ताने जनविकास सामाजिक बहुउद्देशीय भूम या संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या कोण होणार आलमप्रभू नगरीची सुकन्या या कार्यक्रमात पैठणी, नाकातील सोन्याची नथ, सन्मानचिन्ह मिळवण्याचा प्रथम मानकरी माया गायकवाड यांनी तर द्वितीय सौ विद्या खामकर व तृतीय अश्विनी राऊत यांनी मिळवला. या विजेत्यांना चित्रपट अभिनेत्री सौ सविता हांडे व सौ बिना देवधर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
शनिवार दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी जनविकास सामाजिक संस्था भूमच्यावतीने नागपंचमीच्या सणानिमित्त खास महिला भगिनींसाठी दत्त मंदिर भूम येथे कोण होणार आलमप्रभू नगरीची सुकन्या ही स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेसाठी खास अतिथी म्हणून जिंदगानी व तारक मेहता का उल्टा चश्मा फेम अँकर सविता हांडे तर मराठी हिंदी भक्ती गीत लोकगीत चित्रपट गीत गायिका सौ विना देवधर, निर्माते तिळगुळकर यांची उपस्थिती होती.
स्पर्धेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला, तब्बल 5 तास कोण होणार आलमप्रभू नगरीची सुकन्या ही स्पर्धा चालली, यामध्ये पैठणी, सोन्याची नथ, डिनर शेठ , लेमन शेठ, गॅस शेगडी, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा , राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिमा व ज्ञानेश्वरी पारायण प्रत अशी तब्बल 50 बक्षीसे ठेवली होती.
यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय या तिघींना प्रत्येकी सोन्याची नथ, पैठणी व सन्मान चिन्ह देण्यात आले . यामध्ये प्रथम विजेती माया गायकवाड, द्वितीय सौ विद्या खामकर, तृतीय अश्विनी राऊत यांनी पटकावले.
तसेच ज्येष्ठ महिला खेळाडू म्हणून मंदाकिनी सानप , शकुंतला ढवळे, रत्नमाला विभुते, फुलन वटांबे, सविता बोत्रे, किरण बागडे व रोहिणी मोरे यांना बक्षीस मिळाली.
याशिवाय उत्तेजनार्थ बक्षीस देखील देण्यात आली यामध्ये वर्षा भोसले, नसीमा पठाण, सोनाली साठे, जयश्री उनवणे, अश्विनी विभूते , लक्षमी साठे, माधुरी बोत्रे, आरती नलावडे , शितल ढवळे, वैशाली टकले, ऐश्वर्या माळी, प्रियका अस्मर, सुवर्णा गायकवाड, प्रीती चौधरी, शिल्पा बोराटे, राजकन्या नलवडे यांना बक्षिसे मिळाली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोहित ढवळे, सामाजिक संस्थेचे प्रदीप साठे, पत्रकार शंकर खामकर आदींनी परिश्रम घेतले.