
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम :-एखाद्या माजी सैनिकांना जर आत्मनिर्भर अंतर्गत छोटे मोठे व्यवसाय सुरु करायचे असतील तर त्यासाठी केंद्रस्तरीय योजनेतून आवश्यकते सहकार्य निश्चितपणे केले जाईल असा विश्वास माजी सैनिक फेडरेशनचे प्रदेश कार्याध्यक्ष व उदयोगपती नारायणराव अंकुंशे यांनी भूम भेटी प्रसंगी बैठकीत बोलताना दिले.
शनिवार दिनांक 06 आगस्ट 2022 रोजी सैनिक फेडरेशनचे कार्याध्यक्ष व व्यावसायिक, उद्योगपती नारायणराव अंकुश धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्या दरम्यान भूम येथिल पंचायत समिती सभाग्रह येथे बैठकिस उपस्थिति दिली.
बैठकित माझी सैनिक फेडरेशनचे प्रदेश कार्याध्यक्ष व उद्योगपती नारायण राव अंकुश यांनी माजी सैनिकांना आवाहन करताना काही महत्वपूर्ण बाबी वरती सखोल मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी त्या माझी सैनिकांना व्यवसाय उद्योग करायचे आहे त्यांनी निश्चितपणे करावेत त्यासाठी केंद्रस्तरीय योजनेतून परिपूर्ण योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी खात्री दिली
याशिवाय उपस्थित सर्व माजी सैनिकांना काही महत्त्वपूर्ण सूचना देखील केल्या त्यामध्ये प्रामुख्याने
प्रत्येक सैनिकांनी आपल्याला तीन वेळेस काहीही कारण न सांगता या कार्यात हजर राहण्यास सांगितले ते म्हणजे आपला जवान आजी – माजी सैनिक यांचे जर कोणत्या कारणाने निधन झाले’ ते शहीद झाले, तर आपले सर्व कार्य सोडून त्या कार्यक्रमास आपण आपणास उपस्थित राहणे जरुरी आहे. तसेच आपल्या शहरात तालुक्यात जर कोणी माजी सैनिकावर अन्याय होत असेल तर सर्वांनी त्यात सहभागी व्हावे व आवाज उठवावा व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास जो मतदानाचा अधिकार दिला आहे, तो अधिकार आपण योग्य व कार्यतत्त्पर राहून योग्य अशा व्यक्तीलाच निवडून देऊन आपला हक्क अदा करावा असेही आवाहन केले.
यावेळी माजी सैनिक जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब जावळे. सचिव हरिदास शिंदे. भूम तालुका अध्यक्ष हेमंतराव देशमूख . वाशी तालुका अध्यक्ष बबनराव कोळी. भूम तालुका उपाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ. . सचिव प्रभाकरराव हाके. कार्याध्यक्ष पोपटराव जाधव . विधिज्ञ नागरगोजे. बाळासाहेब लोखंडे अभिमन्यू जाधवर . युवराज हाके . शिवाजीराव गिलबिले. राजेंद्र फारणेसह असंख्य माजी सैनिक उपस्थित होते.