
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
सांगली वाळवा इस्लामपूर विभागांचे कर्तव्यदक्ष पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांची बदली झाली आहे. मात्र अद्याप नियुक्तीचे ठिकाण त्यांना देण्यांत आले नसून.तसेच त्यांच्या जागी कोणाचीही नियुक्ती करण्यांत आलेली नाही. वाळवा इस्लामपूर पोलीस उपअधीक्षक पदाचा कृष्णांत पिंगळे यांनी १८ जानेवारी २०१९ रोजी पोलीस उपअधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला होता त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर इस्लामपूर आष्टां शहरांतील गुन्हेगारीता डोळ्यांना मोका लावला होता.तसेच उपविभागांतील अनेक गुन्हेगारांच्या तडीपाराची कारवाई सुद्धा त्यांनी केली होती.तडीपारीची कारवाईमुळे आणि राजकीय मतभेद त्यांच्या बदलीस कारणीभूत असल्यांची सध्या चर्चा आहे. श्री. पिंगळे यांनी गेले साडेतीन वर्षाच्या कार्य काळामध्ये सक्षम पणे वाळवा इस्लामपूर उपविभागांची जबाबदारी सांभाळली होती त्यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासांठी वाळवा इस्लामपूर विभागांसाठी आपल्या सर्व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यासमवेत खूप मेहनत घेतली होती. शिवाय श्री. पिंगळे यांनी सामाजिक बांधिलकी ही जपली जगभरांत कोरोनांचा कहर वाढत असताना त्यांनी शहरांत माणुसकीचं नातं, हा एक व्हाट्सअप ग्रुप तयार करुन सामाजिक मदतीतून गरीब व गरजू लोकांना भोजन व अन्य,धान्य पुरविले माणुसकीचं नातं अभ्यासिका सुरु करुन गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी चांगलाच दिलासा दिला होता. श्री.कृष्णांत पिंगळे यांची पोलीस खात्यामध्ये कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ओळख होती. मात्र त्यांच्या जागेवर अद्याप कोणाचीही नियुक्ती नाही व श्री.कृष्णांत पिंगळे यांची बदली ही राजकीय वर्तुळातून झाल्यांची चर्चा आहे