
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
सांगली विटा खानापूरचे आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभाताई बाबर यांचे दिनांक ३ ऑगस्ट रोजी पुणे येथे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मावळली. शोभाताईंच्या अचानक जाण्यांने उत्तर कोरेगावसह संपूर्ण सांगली जिल्ह्यांमध्ये शोककळा पसरली होती. आज राज्यांचे निर्वाचित मुख्यमंत्री शिंदे हे सांगली कोल्हापूर दौऱ्यावर आले असून. त्यांनी आज दुपारी आमदार अनिल बाबर यांच्या विट्यांतील निवासस्थानी भेट देत बाबर कुटुंबियांचे सांत्वन केले. या दुःखांद प्रसंगात त्यांना धीर देत त्यांच्या दुःखांत आपण सहभागी असल्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. याप्रसंगी बाबर यांच्या निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यांत आला होता. यावेळी आमदार अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास, अमोल सुना शितल, सोनिया आणि नातू शौर्य, राजवीर ,रणवीर तसेच महाराष्ट्र राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार राजेश क्षीरसागर सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेंडाम आधी राजकीय,सामाजिक शैक्षणिक विविध क्षेत्रांतील मंडळी यावेळी उपस्थित होते.