
दैनिक चालु वार्ता कंधार तालुका प्रतिनिधी – माधव गोटमवाड
कंधार : प्रभाग क्रमांक सहा येथील बरेच निकामी विद्युत खांबे अडचणीचे ठरले असल्याने निकामी विद्युत खांबे काढण्याची मागणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कंधार चे उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे एका निवेदनाद्वारे राष्ट्रवादी शहराध्यक्ष तथा संचालक बाजार समिती राजकुमार केकाटे यांनी केली आहे.
प्रियदर्शिनी नगर,सिध्दार्थ नगर व रामरहिम नगर,ही शासकीय वसाहात आहे,या वसाहतीतील काही निकामी विद्युत खांबे पुर्णपणे घरावर झुकलेल्या अवस्थेत झाल्यामुळे ते कधीही घरावर पडू शकतात, अतिवृष्टीमुळे निकामी विद्युत पुरवठा नसलेले खांबे केव्हाही पडून घराचे आर्थिक नुकसान व कोणाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, यासाठी राष्ट्रवादी शहराध्यक्ष तथा संचालक बाजार समिती राजकुमार केकाटे व येथील नागरीकांनी उपयोगात नसलेले काही निकामी विद्युत खांबे काढण्यासाठी उपकार्यकारी अभियंत्यांकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या निवेदनावर राजकुमार केकाटे,कासिम मुसा निजामधोंगडे, चांदू गोविंद यमुलवाड, हरी दाऊ नागलवाड,शिवाजी नळगे, संभाजी कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.