
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता. प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर दि, १३/०८/२०२२ रोजी समाजशास्त्र विभाग आयोजीत अमृत महोत्सवानिमित्त म .फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय ऑनलाईन चर्चासत्राचे उद्घाटन
किनगाव (प्रतिनिधी ) मानवी जीवन आणि आपत्ती याच अतूट नातं आहे निसर्गावस्थेपासून ते आजपर्यंतच्या प्रगत जीवन अवस्थेपर्यंत कोणत्या ना कोणत्या आपत्तीला मानवाला आणि प्राणीमात्राला तोंड द्यावे लागले आपत्ती व्यवस्थापन हा एक सामाजिक विषय राष्ट्रीय चर्चा साठी घेतला याबद्दल महाविद्यालयाच्या अभिनंदन केले आणि आपत्ती ही अटळ आहे आपत्तीचा सामना करून प्रचंड होणारे नुकसान , हानी कशी टाळता येईल याची काळजी घेऊन आपत्ती चे व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र संकुलाच्या प्रोफेसर डॉ वानी लातूरकर यांनी अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय किनगावच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त समाजशास्ञ विभागाच्या वतीने राष्ट्रीय ऑनलाईन चर्चासत्राच्या प्रसंगी दि १२ ऑगस्ट रोजी *आपत्ती व्यवस्थापन* या विषयावर संपन्न होत असलेल्या ऑनलाईन उद्घाटनात बोलताना व्यक्त केले या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे *प्राचार्य डॉ बबनराव बोडके* होते तत्पूर्वी या राष्ट्रीय चर्चासञाचे चे प्रस्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ बळीराम पवार यांनी केले त्यानंतर मार्गदर्शनपर प्रथम सञात *मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त डॉ गजानन बेल्लाळे* यांनी राष्टीय ऑनलाइन चर्चासत्रात सहभागी होऊन मार्गदर्शन करताना डॉ बेल्लाळे म्हणाले की मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आपत्तीमध्ये आग , वीज कोसळणे ,अपघात , युद्धे , बॉम्बस्फोट , भुकंप, महापूर , चक्रीवादळ , सुनामी , दुष्काळ दरड कोसळणे इत्यादीचा समावेश होतो आणि सध्याच्या जागतिक महामारीच्या आपत्तीने मानवी जीवन संकटात सापडले आहे आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे मत मांडले त्यानंतर अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ बबनराव बोडके म्हणाले की आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात परदेशात जशी जनजागृती केली जाते तसे करणे आवश्यक आहे आज च्या चर्चासत्रात अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले हे राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याचे मत माडून अध्यक्षीय समारोप केला तदनंतर द्वितीय सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा डॉ विठ्ठल चव्हाण उपस्थित होते यावेळी मार्गदर्शक दार्जिलिंग च्या विद्यासागर शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सविता मिश्रा होत्या आपत्ती व्यवस्थापनावर डॉ मिश्रा म्हणाल्या की नैसर्गिक आणि मानवी आपत्तीचे मुख्य घटक समजून घेणे आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याद्वारे प्रशासकीय पातळीवर प्रभावीपणे अंमलबजावणी करणे स्थानिक आणि विभागीय स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाच्या सुरक्षेबाबत जिल्हाधिकारी यांना विशेष अधिकार असतात त्या विशेष अधिकाराचा वापर करून प्रशासकीय यंत्रणे सोबतच ,शालेय , महाविद्यालयीन विद्यार्थी , एनसीसी , एनएसएस , होमगार्ड ,पोलीस प्रशासन , स्वयंसेवी संस्था , सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य घेणे गरजेचे आहे असे मत मांडून सविस्तर मार्गदर्शक केले यानंतर अध्यक्ष समारोप प्रा डॉ विठ्ठल चव्हाण यांनी केला या राष्ट्रीय आँनलाईन चर्चासञात एकूण ६४२ प्राध्यापक , शोधकर्ता विद्यार्थी यांनी सहभाग घेऊन मार्गदर्शनाचा लाभ घेतला
या राष्ट्रीय चर्चासञासाठी महाविद्यालयाचे समाजशास्ञ विभाग प्रमुख तथा *संयोजक प्रा डॉ बळीराम पवार,नॅक मुल्याकन समितीचे समन्वयक तथा तांत्रिक सहाय्यक प्रा डॉ प्रभाकर स्वामी* सहाय्यक तंञ सहाय्य प्रा सदाशिव वरवटे , प्रा डॉ विठ्ठल चव्हाण , प्रा बालाजी आचार्य यांनी परिश्रम घेतले सुञसंचालन प्रा डॉ प्रभाकर स्वामी केले तर मार्गदर्शकाचा परिचय प्रा संजय जगताप यांनी केला आणि शेवटी आभार मानले राष्ट्र गीताने राष्ट्रीय चर्चासत्राची सांगता झाली