
तिरंगा ध्वज ..
हिरवे भगवे निळे
काळे लाल पिवळे
जागोजागी झेंडे ते
फडके वेग वेगळे
प्रत्येकपक्षाचे न्यारे
झेंडे बनले वेगळे
विचारआचार सारे
एक दुजा ना जुळे
दांडे जरी एक सम
उगा भांडती खुळे
निषेध कराया सदा
तयारचं झेंडे काळे
तिरंगा दिसता मात्र
हात आपसूक जुळे
आपण किती खुजे
झेंड्यांना सर्व कळे
अहंकार खोटा गळे
उर्जाअशी सळसळे
तिरंग्या उच्च स्थान
महत्व सर्वांना कळे
तिरंग्याची अस्मिता
उत्साह तो सळसळे
बाकी फिके सगळे
स्वरूप रंग आगळे
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६..
www.kavyakusum.com
२)
दोन्ही हात ..
संरक्षणार्थआपल्या
जागृत सदैव आर्मी
देशभक्ती खरीशक्ती
मनात उसळते उर्मी
जवान ते तारणहार
रे रंग त्यांचा निधर्मी
एकच लक्ष ठाऊक
प्रहार दुश्मनां वर्मी
सतावे तीचं समस्या
साधन सामुग्री कमी
आधुनिक शस्त्रास्त्रे
कुठलीचं नाही हमी
विरोध शस्त्रखरेदीस
कसेआम्ही पुरोगामी
विरोध करतो उगाचं
मनात कीटक कृमी
फौजी अन् सिव्हील
नीत हवी दिलजमी
एकहोता हात दोन्ही
बहरेल भारत भूमी
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६.
www.kavyakusum.com
३)
गोपाळकाला .
गोविंदाआलायं रे
पथक खरेउत्साही
दहीहंडी फोडली रे
सुखानंदात न्हाही
पोहे लोणचे लाही
चणे साखर दही
गोपाळकाला केला
झाला अगदी सही
फोडी फळांच्याही
त्यांत घाला काही
कान्हाला आवडता
दुसरा पदार्थ नाही
वाटून खावा काला
चवीसअवीट ग्वाही
कणभर खाणाराही
चाटून पुसून खाई
एकात्मतेचे प्रतिक
एक संघाची ग्वाही
गोपाळ नाव गाजूदे
दुमदुमे दिशा दाही
पुन्हा मिळो काला
वाट पहातचं राही
जन्माष्टमी कधी हो
प्रश्र्न विचारत राही
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
www.kavyakusum.com