
दैनिक चालु वार्ता पुणे जिल्हा उपसंपादक- शाम पुणेकर
पुणे: दहा कोटींच्या रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रारी नंतर वानवडी पोलिसांकडून तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी जे. पी. रवीकुमार, त्यांची पत्नी तसेच आर. सुवर्णा तिघे रा. आंध्रप्रदेश आणि शिवानंद हत्ती रा. सांगली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत हर्षित दिनेशकुमार गांधी वय ३२, रा. घोरपडी यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींनी गांधी यांचे वडील दिनेशकुमार इंदरचंद गांधी यांना व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवले होते. आरोपींनी कन्स्ट्रक्शन ऑफ कॉटन इंडस्ट्री अॅण्ड ग्रोथ ऑफ कॉटन इंडस्ट्री तसेच श्री रामा इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूक तसेच भागीदारीची आमिष दाखविले होते. आरोपींनी दिनेशकुमार गांधी यांच्याकडून दहा कोटी १७ लाख रुपये घेतले होते. त्यानंतर दिनेशकुमार यांना आरोपींनी एक काही लाख रुपये दिले. २०१९ मध्ये दिनेशकुमार यांचे निधन झाले. त्यानंतर हर्षित यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली. हर्षित यांना जीवे मारण्याची धमकी देऊन पैसे देण्यास नकार दिला.