
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-
कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावच्या भूमीतील सुपुत्र संभाजी बबनराव पुरीगोसावी यांचा जन्म २९ एप्रिल १९९१ रोजी करंजखोपच्या नगरीमध्ये झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण जि. प. करंजखोप येथे तर पुढील शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल करंजखोप येथे झाले. अगदी हलकीची आणि गरीब परिस्थिंतीतून श्री. संभाजी गोसावी जीवनामध्ये सर्व गोष्टी अनुभवल्या.त्यांना शेती नसताना सुद्धा त्यांना बऱ्यापैकी शेती क्षेत्रांचाही चांगलाच अभ्यास होता. गरीब आणि हलकीचे परिस्थिती असल्यांमुळे श्री.गोसावी यांनी १ ली ते १० पर्यंत शिक्षण गावातच घेतले आणि पुढील पैशाअभावी त्यांनी पुढील शिक्षणांला राजीनामा दिला. गावातीलच सामाजिक,राजकीय क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे धनंजय धुमाळ( बापू ) यांच्या शेतीमध्ये श्री.गोसावींनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासांठी शेतामध्ये काम केले.श्री.धुमाळ यांचेही गोसावी यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. काही कालावधीनंतर त्यांनी सुरक्षारक्षक म्हणून सातारा,पाचगणी महाबळेश्वर या ठिकाणी मुलींच्या कॉलेजला काम केले. त्यांची वागणूक,वर्तणूक पाहून शाळेतील शिक्षक शिक्षिका यांनी सुद्धा त्यांना चांगली मार्गदर्शन लाभले. सन २००५ मध्ये त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले त्यामुळे एका आईची आणि कुटुंबाची जबाबदारी श्री.गोसावी यांच्यावर पडली. ते एकलुते एक असल्यांमुळे त्यांच्याकडे कुटुंबाची जबाबदारी पडली. त्यांच्या मनातही वाटले नव्हते, की मी सर्व जिल्हास्तरीय पत्रकार म्हणून माझी ओळख निर्माण होईल. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे श्री.गोसावींना म्हणण्यांत काही वावगे ठरणार नाही. सातारा कोल्हापूर,सांगली, पुणे सोलापूर अशा अनेक जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तसेच सर्व क्षेत्रांतील प्रशासकीय अधिकाऱ्यांशी त्यांचा चांगलाच परिचय आहे. आणि ते सुद्धा सर्व जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांच्या चांगलेच परिचयांत झाले आहेत. चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकार अशी ओळख असते.श्री.गोसावी यांचा जास्तीत जास्त परिचय म्हणजे राज्यांतील पोलीस दलाशी चांगलाच आहे.त्यांना महाराष्ट्रांतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या विषयी खूप आदर आणि अभिमान वाटतो. श्री. गोसावी हे सध्या दैनिक चालू वार्ताचे मुख्य संपादक डी.एस लोखंडे पाटील साहेब यांच्याकडे कोरेगांव तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.श्री. गोसावी यांची प्रत्येक बातमी की त्यांच्या जिल्ह्यांतीलच नव्हे तर सर्व जिल्हास्तरीय असते मात्र संपादक सुद्धा त्यांच्या बातम्या पाहून अगदी भारांवून जातात. महाराष्ट्रांतील देशाचे संरक्षण करणारे वीर जवान हे शहीद झाले तर श्री.गोसावी यांना अवघ्या काही मिनिटांतच संबंधित जवानाविषयी संपूर्ण माहिती मिळते. याशिवाय जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा प्रशासनांतील अधिकारी यांच्या बदल्यांविषयी कोण नवीन अधिकारी येणार आहेत किंवा कोणाची कोणत्या जिल्ह्यांसाठी अधिकाऱ्यांची वरचढ लागू आहे किंवा कोणत्या अधिकाऱ्यांची कोणत्या जिल्ह्यांमध्ये नेमणूक होईल या संदर्भातील माहिती सुद्धा श्री.गोसावी यांना कल्पना असते. यावेळी श्री गोसावी पुढे म्हणाले की मी माझ्या जीवनामध्ये आणि मूर्ती लहान पण कीर्ती महान असे म्हणण्यांत काही वावग ठरणार नाही? मला वाटत नव्हतं की मी सर्व जिल्हास्तरीय पत्रकार म्हणून माझी ओळख निर्माण होईल हे माझे श्रेय फक्त माझ्या स्वर्गीय कै. बबनराव पुरीगोसावी आणि माझ्या मातोंश्री श्रीमती. कविता पुरीगोसावी यांचे आहे. अजूनही माझी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.माझ्या प्रत्येक गोष्टीला तिची मला नेहमीच आणि मोलाची साथ आहे.