
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
कंधार पासून अवघ्या ०३ कि.मी. अंतरावर असलेले नवघरवाडी हे गाव नेहमी चर्चेचा विषय असतो, अवघी १००० लोकसंख्या असलेल्या गावात वेगवेगळ्या क्षेत्रात अधिकारी कर्मचारी म्हणून अनेक पदावर या गावातील माजी विद्यार्थी आहेत, एमबीबीएस, बी ए एम एस, इंजिनीयर ,वकील, बँक मॅनेजर, सैन्यात अधिकारी, पीएसआय, शिक्षक, पोलीस इत्यादी सर्व क्षेत्रात या गावचा एक वेगळा ठसा अनुभवास येतो. औचित्य होते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवघरवाडी चे माजी विद्यार्थी व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कंधार येथे कार्यरत असलेले पोलीस अंमलदार गुरुनाथ कारामुंगे यांनी आपले शाळेबद्दल असलेली ऋणाई शब्दाने व्यक्त न करता गावातील पहिली ते चौथी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करून आपली गावाबद्दल असलेली आस्था, प्रेम त्यांनी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका कार्याध्यक्ष दत्ताजी कारामुंगे, मनोहर कारामुंगे, प्राध्यापक डॉ. खुशाल कारामुंगे, माधवराव कारामुंगे, अँड. महेश कारामुंगे, सरपंच पूजा कारामुंगे , उपसरपंच सखाराम पेंडलेवाड,कैलास नवघरे ,कपिल नवघरे, भगवान नवघरे, सखाराम नवघरे, बालाजी नवघरे,कंटीराम नवघरे,सचिन जाधव,ग्रामसेवक दिपीके मॅडम, मुख्याध्यापक कदम सर, भोसीकर मॅडम व अंगणवाडी कर्मचारी, सर्व विद्यार्थी व गावकऱ्यांची उपस्थिती होती.