दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – प्रा अंगद कांबळे
म्हसळा –कन्या शाळा म्हसळा येथे शिक्षक भारती संघटना म्हसळा तालुका यांच्या वतीने मांदाटणे ग्रुप ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच आणि म्हसळा अंनिस समितीचे तालुका सक्रिय पदाधिकारी श्री चंद्रकांत ल. पवार यांना नुकत्याच पारपडलेल्या स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सव दिनानिमित्ताने ग्रामपंचायतीचा ध्वजारोहण गावात10 वी ला पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विध्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून खऱ्याअर्थाने चांगला उपक्रम राबवून तालुका, जिल्हा स्तरावर उत्कृष्ट संदेश या माध्यमातुन विद्यार्थ्याला यातून चांगली प्रेरणा मिळाली आहे. तसेच प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक आदर्श निर्माण केला या उत्तमकार्यबदल
मांदाटणे ग्रामपंचायतचे युवा सरपंच श्री चंद्रकांत ल. पवार यांचा सन्मान पत्र व पुष्पगुछ देवून गौरविण्यात आले या वेळी. म्हसळा गटशिक्षण अधिकारी दौड साहेब केंद्र प्रमुख नरेश सावंत, केंद्रप्रमुख अरविंद मोरे सर, राहुल नाईक,जयसिंग बेटकर श्री दिलीप शिंदे आणि शिक्षकवृन्द मोठ्या संख्येने उपस्थित होता.
