
दैनिक चालु वार्ता परभणी प्रतिनिधी-दत्तात्रय कराळे
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे ५० कोटी रुपयांचे थकीत अनुदान शासनाने त्वरीत द्यावे, अशी मागणी परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार डॉ. राहूल पाटील यांनी केली आहे.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला मागील वर्षी ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शासनातर्फे १०० कोटी रुपयांचे अनुदान या विद्यापीठाला देण्यात यावे, अशी मागणी आ. राहूल पाटील यांनी केली होती. परंतु शासनाने शंभर कोटी रुपये न देता केवळ ५० कोटी रुपयेच मंजूर केले गेले. मागील वर्षी मंजूर करण्यात आलेलं हे अनुदान शासनाने अद्याप न दिल्यामुळे राज्याचे कृषीमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याकडे आ. राहूल पाटील यांनी केली.
मागील वर्षी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ चे सरकार कार्यरत होते. राज्यात आता झालेल्या सत्तांतरामुळे मागील वर्षी सत्तेत असलेले आ. पाटील यांना आता विरोधी बाकावरुन मागणी करावी लागत आहे. राजकीय सत्तेचा सारीपाट कधी काय गुल खिलवतो हे सांगणेच कठीण होऊन बसले जाते एवढे मात्र नक्की.