दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा- शाम पुणेकर.
पुणे : महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभाग, पुणे महानगर पालिका व पुणे महानगर परिवहन महामंडळ यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांना पुण्यातील काही महत्त्वाच्या मंडळाचे बसने दर्शन घेण्याची प्रशासनाने खास सोय केली आहे, ते सुद्धा अगदी मोफत.
त्यासाठी फक्त वय वर्षे ६० पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दिनांक ०१, ०२, ०५, ०६ व ०७ सप्टेंबर २०२२ या दिवशी वेळ सकाळी ८ ते १२ वा या दरम्यान ही बस इच्छूक ज्येष्ठ नागरिकांना घेवून धावणार आहे.
शिवाजीनगर, स्वारगेट व पुणे रेल्वेस्थानक या ठिकाणांहून रोज १ बस सुटणार असून VIP दर्शन, AC बसमधून प्रवास, अल्पोपहार व पाणी, शौचालय थांबा, टूर गाईड, आरोग्यसेवक इत्यादी सुविधाही उपलब्ध आहेत.
त्यासाठी दगडूशेठ, कसबा, तुळशीबाग, गुरूजी तालीम, तांबडी जोगेश्वरी, भाऊ रंगारी वाडा आणि केसरीवाडा ही प्रमुख आकर्षणे आहेत.
प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार असून अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी नागरिकांनी पर्यटन महासंचालनालयाच्या खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे प्रशासनाने कळविले आहे.
पुणे : अजय 7887399217 / पुजारी 8888363647
गणेश दर्शन सहल मोफत आहे. तसेच १५ किंवा त्यापेक्षा जास्त भक्त जर एकाच इमारतीतून/विभागातून येणार असतील तर त्यांना तेथून न्यायची सोय होवू शकते. लवकर संपर्क साधावा हेही प्रशासनाने कळविले आहे.
