
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
=====================
औरंगाबाद:-जय संघर्ष संस्था प्रणित जय संघर्ष वाहन चालक,चालक मालक संघटनेच्या वतीने वाहन चालक,चालक मालकांच्या विविध समस्या व विविध मागण्या संदर्भात मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मागील सहा ते सात वर्षा पासून निवेदन देऊन हि शासनाच्या वतीने वाहन चालकांच्या मागण्यांकडे दूर्लक्ष केल्या जात आसल्याच्या कारणाने जय संघर्ष संघटनेच्या वतीने दि.16 व 17 सप्टेंबर 2022 आसे एकूण दोन दिवस औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालया समोर ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
जय संघर्ष संघटनेच्या वरील आंदोलनास शिवसेना नेते आ.श्री चंद्रकांतजी खैरे साहेबांच्या सहमतीने शिव वाहतुक संघटनेचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष श्री उस्मानशहा यांनी आज संघटनेचे दि.10/9/2022 रोजी सुभेदारी विश्राम गृह औरंगाबाद येथे जय संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर यांना 16 व 17 तारखेच्या आंदोलनास जाहिर पाठिंब्याचे पत्र दिले.
प्रसंगी जय संघर्ष संघटनेचे जि.अध्यक्ष लक्ष्मण आण्णा सोनवणे व चरण राजपुत तर शिव वाहतूक सेनेचे जि.उपाध्यक्ष नईम पठाण,शेख सलमान,फुलंब्री ता.अध्यक्ष जमीलभाई,फुलंब्री ता.उपाध्यक्षक सैय्यद मोईन व शेख इम्रान इत्यादींच्या उपस्थिति मधे पाठिंब्याचे पत्र दिले.