
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
रघुकुल नायक मर्यादा पुरुषोत्तम जगद वंदय प्रभु श्रीराम यांच्या जीवनात सुद्धा एक दिवस कठिण प्रसंग आला .आणि न्याय सत्य धर्माची बाजु असताना देखिल शक्ति आपल्या बाजुने न लढता आज रावणाच्या असत्या च्या बाजुने लढत आहे .हे लक्षात आल्यानंतर प्रभु श्रीराम यांच्या समावेत युद्धातील प्रमुख सहकारी, लक्ष्मण , सुग्रीव, बिभिषण, हनुमंत,जभुवंत अगंद हे सगळे विचार विमर्श करण्यासाठी एकत्र बसले . जेव्हा ज्ञान असुन कामी येत नाही तेव्हा अनुभव कामी येतो .आणि या वेळी जाबुवंत यांनी एक सुचना केली कि रावण दुष्ट असुन उपसाना आराधना करून शक्ति प्रसन्न करू शकतो.आपण सत्याच्या बाजूने आहेत आपण शक्ति आराधना आरंभ करावी आम्ही सगळे युद्ध संभाळु जाबुवंत यांची विनंती ऐकुन सगळे आनंदी प्रसन्न झाले आणि भव्य दिव्य शक्ति आराधना पुजा आरंभ केली.सदर पुजा नऊ दिवस देवीची आराधना प्रभु श्रीराम यांनी केली.व शेवटच्या क्षणी देवीने कठिण परिक्षा घेतली .धिरोदत प्रभु श्रीराम यांच औदार्य पाहुण भक्ति निष्ठा समर्पण कामी आलं. देवी स्वतः प्रकाट झाली व विजयी भव आशिर्वाद दिला. प्रभु श्रीराम यांची आराधना यशस्वी झाली हा शुभदिन म्हणजे विजयादशमी नवरात्र महोत्सव दसरा होय.
राम की शक्तिपूजा का एक अंश-
रवि हुआ अस्त, ज्योति के पत्र पर लिखा
अमर रह गया राम-रावण का अपराजेय समर।
आज का तीक्ष्ण शरविधृतक्षिप्रकर, वेगप्रखर,
शतशेल सम्वरणशील, नील नभगर्जित स्वर,
प्रतिपल परिवर्तित व्यूह भेद कौशल समूह
राक्षस विरुद्ध प्रत्यूह, क्रुद्ध कपि विषम हूह,
विच्छुरित वह्नि राजीवनयन हतलक्ष्य बाण,
लोहित लोचन रावण मदमोचन महीयान,
राघव लाघव रावण वारणगत युग्म प्रहर,
उद्धत लंकापति मर्दित कपि दलबल विस्तर,
अनिमेष राम विश्वजिद्दिव्य शरभंग भाव,
विद्धांगबद्ध कोदण्ड मुष्टि खर रुधिर स्राव,
रावण प्रहार दुर्वार विकल वानर दलबल,
मुर्छित सुग्रीवांगद भीषण गवाक्ष गय नल,
वारित सौमित्र भल्लपति अगणित मल्ल रोध,
गर्जित प्रलयाब्धि क्षुब्ध हनुमत् केवल प्रबोध,
उद्गीरित वह्नि भीम पर्वत कपि चतुःप्रहर,
जानकी भीरू उर आशा भर, रावण सम्वर।
लौटे युग दल। राक्षस पदतल पृथ्वी टलमल,
बिंध महोल्लास से बार बार आकाश विकल।
वानर वाहिनी खिन्न, लख निज पति चरणचिह्न
चल रही शिविर की ओर स्थविरदल ज्यों विभिन्न।
‘राम की शक्तिपूजा’ की कुछ अन्तिम पंक्तियाँ देखिए-
“साधु, साधु, साधक धीर, धर्म-धन धन्य राम !”
कह, लिया भगवती ने राघव का हस्त थाम।
देखा राम ने, सामने श्री दुर्गा, भास्वर
वामपद असुर स्कन्ध पर, रहा दक्षिण हरि पर।
ज्योतिर्मय रूप, हस्त दश विविध अस्त्र सज्जित,
मन्द स्मित मुख, लख हुई विश्व की श्री लज्जित।
हैं दक्षिण में लक्ष्मी, सरस्वती वाम भाग,
दक्षिण गणेश, कार्तिक बायें रणरंग राग,
मस्तक पर शंकर! पदपद्मों पर श्रद्धाभर
श्री राघव हुए प्रणत मन्द स्वरवन्दन कर।
“होगी जय, होगी जय, हे पुरूषोत्तम नवीन।”
कह महाशक्ति राम के वदन में हुई लीन।
लंकापती रावण आणि प्रभु श्रीराम यांच्या दरम्यान चालू असलेलं युद्ध निर्णयक वळणावर असताना एक दिवस रावणाने व राक्षस सैन्याने वानर सेना खुप जबरदस्त झुंज दिली . अगदी तो दिवस खुप प्रभावी ठरला रावणासाठी युद्धाच्या सुरवातीपासून पासुन म्हणजे सकाळी पासुन संध्याकाळी पर्यंत रावणाच युदधवर प्राबल्य राहिल .साक्षात शक्ति रावणाच्या बाजुने लढत आहे हे प्रभु श्रीराम यांनी पाहिलं . अगदी संध्याकाळी युद्ध संपुण सगळे आप आपल्या शिबीरात पोहचले सगळे राक्षस अगदी आनंदाने नाचु लागले होते.तर वाणर सेना चिंताग्रस्त होती हे सगळं पाहुण प्रभु श्रीराम हे खिन्न झाले आणि नेमकं याच वेळी सुर्यास्त झाला होता .पण याच वेळी हार न मानता प्रभु श्रीराम यांच्या मनात आशेचा नविन किरण निर्माण झाला आणि आपले प्रमुख सहकारी यांच्या सोबत विचार विमर्श करण्यासाठी बैठक घेतली याच दरम्यान अनुभवी जांबुवंत यांच्या सुचनेनुसार निर्णय झाला कि प्रभु श्रीराम यांनी शक्ति पुजा आराधना आरंभ करावी . तोपर्यंत बाकी सर्व वीर युद्ध चालू ठेवतील . दरम्यान पुजा संपन्न झाल्यानंतर एकशे आठ कमल पुष्प प्रभु श्रीराम देवीच्या चरणी चढवतील व पुजा निर्विघ्न संपन्न होईल यासाठी एकशे आठ कमल पुष्प हनुमान जी यांनी तातडीने आणले. नऊ दिवसाची नवरात्री आराधना चालु झाली.पहिल्या दिवसांपासून एक एक क्षण प्रभु श्रीराम हे आपल्या प्रभावी धेय्य शक्ति ने निष्ठा पुर्वक आराधना करत होते . अगदी शेवटचा दिवस शक्ति पुजा आराधना झाल्यानंतर देवी प्रसन्न होईल व पुजा निर्विघ्न चालू होती असं असताना आराधना पुजा पुर्ण करूत असताना प्रभु श्रीराम राम एकरूप होऊन कमल पुष्प देवी चरणी अर्पण करत होते .एकशे सात कमल पुष्प अर्पण केले.पुजा अगदी शेवटच्या टप्प्यात देवी प्रसन्न होणार एकच कमल पुष्प अर्पण करणं बाकी असतानाच शेवटचं कमल पुष्प अर्पण करण्यासाठी जेव्हा प्रभु श्रीराम सज्ज झाले तेव्हा मात्र अन् अपेक्षित धक्का बसला शेवटचं कमल पुष्प थाळी मध्ये नाही .पुजा आराधना शेवटच्या क्षणी अर्धवट राहिल . आणि शक्ति प्रसन्न होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली.याच दरम्यान प्रभु श्रीराम यांनी आपल्या भात्यातील बाण काढला क्षणाचाही विलंब न करता शेवटचं कमल पुष्प म्हणून आपला स्वतःचा डोळा बाणाने काढणार आणि देवी चरणी अर्पण करणार तोच इतक्यात साक्षात स्वतः शक्ति प्रभु श्रीराम यांची परिक्षा घेण्यासाठी गायब केलेल्या कमल पुष्पा सह देवी प्रकाट झाली. प्रभु श्रीराम यांची साधना आराधना शक्ति पुजा यशस्वी झाली देवीने विजयी भव आशिर्वाद दिला.हा विजयाची मुहूर्त मेढ ठरलेला विजयी क्षण म्हणजे नवरात्री उत्सव महोत्सव दसरा.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301