
दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी:- राम चिंतलवाड
नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदी नागोराव शिंदे तर हिमायतनगर तालुका उपाध्यक्ष पदी गंगाधर गायकवाड……
निवड झालेल्या सर्व पत्रकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा….
हिमायतनगर ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या आणि अडचणी आपल्या लेखणीच्या जोरावर परखडपणे व निर्भीडपणे शासनाच्या दरबारी मांडून त्याला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारे ग्रामीण भागातील पत्रकार यांना एकजुट करून कार्य करणारी संघटना महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटना ही नेहमी तत्पर असते. या संघटनेची नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.हिमायतनगर येथील शासकीय विश्रामगृहात भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान चे शिल्पकार लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पदाधिकारीऱ्यांची निवड करण्यात आली,
यात नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदी नागोराव शिंदे पळसपुरकर तर हिमायतनगर तालुका अध्यक्ष पदी परमेश्वर सुर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष पदी गंगाधर गायकवाड दिघीकर, सचिव पदी सुनिल चव्हाण ,सल्लागार म्हणून आनंद जळपते, सहसल्लागार म्हणून पांडुरंग मारावे, कोषाध्यक्ष विनोद चंदनवार तर तालुका संघटक पदी विजय वाठोरे सरसमकर,कृष्णा राठोड सहसचीव पदी निवड करण्यात आली.उर्वरित कार्यकारणी पुढील बैठकीत पुर्ण होणार आहे.या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ नांदेड जिल्हा अध्यक्ष हिमांशू इंगोले व जिल्हा सचिव राजकुमार भुसारे ,तरुण भारत चे हिमायतनगर प्रतिनिधी मनोज पाटील ,लोकपत्रचे दिलीप शिंदे ,मराठा साम्राज्य नांदेड जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना शिंदे हे उपस्थित होते.
यावेळी पत्रकार माधव कदम, राजु गायकवाड ,बाबुराव जरगेवाड, पांडुरंग मिराशे ,प्रशांत राहुलवाड यांच्यासह ग्रामीण भागातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.