
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर: देगलूर तालुक्यातील मरखेल येथील जिल्हा परिषद शाळा चालते शिक्षकाविना अनेक वेळा लेखी लिहून देऊन प्रशासनाला जाग येत नाही तर परत कुलूप ठोक आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद हायस्कूल मरखेल शाळेस चा इशारा दिला
दि. 26/09/२०१२
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड.
जिल्हा परिषद हायस्कूल मरखेल ता. देगलूर येथे शिक्षक उपलब्ध न करून दिले बाबत.
1. दिनांक 20/06/2022 रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. नांदेड यांना दिलेले पत्र.
2. 14/07/2022 रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. नांदेड यांना दिलेले पत्र 3. 22/07/2022 रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. नांदेड यांना दिलेले पत्र.
4. 12/09/2022 मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड कुलूप बंद आंदोलनाचे पत्र.
5:15/09/2022 B.EO पंचायत समिती देगलूर यांनी दिलेले आश्वासन पत्र
वरील विषयी आपणास कळविण्यात येते की मरखेल येथील जि. प. हायस्कूल मरखेल ची परिस्थिती वारंवार आपल्या निदर्शनास आणून दिल्यानंतर 12/09/2022 रोजी कुलूपबंद आंदोलन च्या दिवशी माननीय B.EO यांनी चार शिक्षक दोन ते तीन दिवसात पुरवण्याची लेखी आश्वासन दिल्यानंतर कुलूप बंद आंदोलन मागे घेण्यात आले होते मात्र आज 10 से 11 दिवसानंतर केवळ एकच शिक्षकाची पूर्तता करण्यात आली. अद्याप पर्यंत गणित इंग्रजी या विषया सहित 3 शिक्षक आज तागायत न दिल्यामुळे उद्या होणाऱ्या समुपदेशन कार्यक्रमात आमच्या शाळेचा विचार व्हावा अन्यथा म्हणजेच दिनांक 04/10/2022 रोजी परत शिक्षक मिळेपर्यंत कुलूप बंद आंदोलन करण्यात येईल असेच सर्व मरखेल ग्रामस्थांनी इशारा दिला एकीकडे शासन म्हणते शिक्षणाचा स्थर वाढविण्यासाठी व तळागाळातल्या मुलांना शिक्षण मिळाला पाहिजे व सर्व शिक्षणा अभियाना मार्फत सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे अशी जर शाळेला सहा सहा महिने जर शिक्षक मिळत नसेल तर तिथल्या विद्यार्थ्यांचा भवित्य अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही.त्यासाठी शासनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढून मरखेल जिल्हा परिषद शाळेला शिक्षकंकाची भरती लवकरात लवकर करावी.