
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी -अंगद कांबळे
आविष्कार फाउंडेशन इंडिया चे वतीने मुनव्वरी कोंडविलकर यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला
5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिनांक 25 सप्टेंबर 2022 रोजी श्रीवर्धनच्या पवित्र भूमीत राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला यासंस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजयजी पवार यांनी आपले प्रास्ताविकात संस्था मागील पंधरा वर्षापासून सर्व क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करत असते संस्थेचा इतिहास विषद करताना संस्थेने केलेल्या इतर कार्याची माहिती दिली.
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार माननीय अदितीताई तटकरे यांनी आपल्या मनोगतात कोणत्याही व्यक्तीचे विकासात शिक्षकांचे महत्व मोठे आहे. शिक्षक हे भावी पिढी तयार करत असतात. कोणताही व्यक्ती आपल्या शिक्षकांना विसरत नाही ज्या वेळेला ग्रामस्थ आपल्या शिक्षकाच्या पुरस्कारासाठी शिफारस करतात त्यावरूनच त्या शिक्षकाचे काम लक्षात येत असते. शिक्षकांना खूप कामे करावे लागतात परंतु देशाची चांगली पिढी घडवण्याचे काम हे फक्त शिक्षकच करू शकतात. शिक्षकाचे महत्व मोठे आहे त्यांचा यथोचित सन्मान झालाच पाहिजे आणि ही अविष्कार फाउंडेशन संस्था राज्यातील शिक्षकांना सन्मानित करतच असते त्यातच माझ्या मतदारसंघात कार्यक्रम घेऊन आमच्या भागातील शिक्षकांचा सन्मान केला याबद्दल संस्थेला व संस्थेचे पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. यानंतर राजेश सुर्वे,प्रा.शेख व इतर मान्यवरांनाही आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात एकुण 60 जणांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी अविष्कार आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर इंडिया यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय *गुणवंत शिक्षिका पुरस्कार* आमदार मा आदितीताई तटकरे व आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा श्री संजय पवार,प्रा.महंमद शेख व अन्य मान्यवरांचे हस्ते रायगड जिल्हा परिषद शाळा वारळ उर्दू येथे कार्यरत शिक्षिका श्रीम. मुनव्वरी मुबीन कोंडविलकर यांना प्रदान करण्यात आला.
श्रीम.कोंडविलकर यांनी आपल्या सेवेची सुरुवात फेब्रुवारी 2003 साली महाड तालुक्यातील राजेवाडी येथून केली यानंतर म्हसळा गटातील वरवठणे उर्दू व 2011 पासून आजपर्यंत वारळ उर्दू येथे कार्यरत आहेत.त्यांचे वडील अ.रेहमान कोंडविलकर हे सेवानिवृत्त पदोन्नती मुख्याध्यापक असल्याने त्यांना त्यांचेकडून शिक्षकी पेशाचे बालकडू मिळाले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात आवड निर्माण होणेसाठी तसेच कला, कार्यानुभव मधील क्राफ्ट अंतर्गत कागदकाम, लोकर पासून विविध साहित्य,टाकावू पासून टिकाऊ साहित्य तयार करणे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या कडून वेगवेगळ्या प्रकारची फुले,फुलदाणी,तोरण, अन्य साहित्य तयार करून घेण्याचे काम केले आहे.विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी व विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात . तंत्रस्नेही शिक्षिका म्हणून सर्व प्रकारची ऑनलाईन कामे करत आहेत. त्यांनी शैक्षणिक काम करत असतानाच मुख्याध्यापकांचे मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ यांचेसोबत सलोख्याचे संबंध निर्माण करून त्यांच्या कडून शाळेसाठी विविध प्रकारची मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांच्या टाकाऊ पासून टिकाऊ या उपक्रमाला तालुका पातळीवर विज्ञान प्रदर्शनात क्रमांक मिळाला आहे.
त्याच बरोबर कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून देखील उत्तम काम केले आहे.तसेच केंद्र आणि तालुका स्तरावरील क्रीडा स्पर्धा ,विज्ञान प्रदर्शन ,विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात.या सर्व बाबींचा विचार करून त्यांना आविष्कार फाउंडेशनचे वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यांना पुरस्कार मिळाले बद्दल गटशिक्षणाधिकारी मा श्री संतोष दौंड, केंद्र प्रमुख श्री किशोर मोहिते, मुख्याध्यापक श्रीम.तबस्सुम कोंडविलकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री कय्युम मुकादम ,उपाध्यक्ष श्रीम समीना काझी ,सलाउद्दिन मुकादम,अकिल काझी,नायफा बखशुल्लाह,जाविद बेडेकर,सिकंदर अकलेकर, मुबश्शीर करदेकर जुबेर सर, सेवानिवृत्त शिक्षक मुराद बंदरकर,समीरा कोंडविलकर,अमीना बंदरकर, डॉ सबा शेख,शबाना जलगावकर,नफिसा माटवणकर,नदिमोद्दिन सय्यद,,सर्व सदस्य,पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षकवृंद, अखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री सोपान चांदे, उपाध्यक्ष सौ गीतांजली भाटकर, कैलास कळस, तालुका अध्यक्ष सौ शुभदा दातार, सरचिटणीस रमेश जाधव, उपाध्यक्ष श्री विजय घाटगे, दिनेश पाटील, संगिता आंबेडकर, संगिता निरणे,पनिता गावित यांनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले.
पुरस्कार वितरण समारंभास नाट्यकलाकार मा श्री रविंद्र चौधरी,सुशिल कदम, म्हसळा टाईम्स चे उपाध्यक्ष NES म्हसळा येथे कार्यरत प्रा.महंमद शेख, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परीषदेचे अध्यक्ष श्री राजेश सुर्वे,संस्थेचे कोकण विभागीय अध्यक्ष श्री संदीप नागे, जिल्हा अध्यक्ष श्री शंकर शिंदे, अखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष श्री किशोर मोहिते व अन्य मान्यवर उपस्थित होते.