
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
माळी महासंघाच्या वतीने इंदापुर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील युवा कार्यकर्ते शांताराम बोराटे यांची नुकतीच माळी महासंघाच्या इंदापूर शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असल्याची माहिती माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरूण तिखे व प्रदेश महासचिव चंद्रकांत वाघोले यांनी दिली.
लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड असणारे शांताराम बोराटे यांनी आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.शांताराम बोराटे हे मुळचे विठ्ठलवाडी गावचे असून त्यांनी विठ्ठलवाडी तसेच इंदापूर तालुक्यातील माळी समाजातील सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी अग्रेसर राहिले आहेत.
निवडीबद्दल बोलताना शांताराम बोराटे सांगितले की आपण इंदापूर शहराबाहेर इंदापूर तालुक्यामध्ये समाज बांधवांना एकत्र करून, समाज्याच्या न्याय हक्कासाठी लढा देणार आहोत, त्यांच्या निवडीबद्दल माळी महासंघाचे विश्वस्त अण्णा गायकवाड तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.