दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार:- शेतकरी बांधवांनो 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान यासंदर्भात आज एक नवीन अपडेट आलेले आहे.
50 हजार रुपये अनुदानाची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. परंतु त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांची नावे येऊन सुद्धा आणि KYC केवायसी करून सुद्धा अकाउंट मध्ये पैसे जमा झालेले नाहीत. अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. यादीत नाव येऊन केवायसी करून पैसे खात्यात न पडण्याचा प्रॉब्लेम हा मुख्यतः डीसीसी बँक (जिल्हा मध्यवर्ती बँक) ला आलेला होता.त्यामुळे आता डीसीसी बँक च्या पहिल्या यादीतील लाभार्थी शेतकऱ्यांना (ज्यांना आतापर्यंत पैसे आले नाहीत) आज पासून 50 हजार रुपये अनुदान पडणार आहे.50 हजार रुपये अनुदान यांच्या याद्या गावानुसार प्रकाशित करण्यात आलेला आहेत.
