
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
.
देगलूर:शुक्रवार, दि. 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा. MSEB कार्यालय, देगलूर येथे शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने जमावे…
महावितरण कंपनी ही शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत सर्वसामान्यांना लूटत असते. शेतकऱ्यांच्या अडीअडचणीचा फायदा घेत आपली मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत असते. ऐन रब्बी हंगामावेळी सक्तीची वीजबील वसूलीची मोहिम काढून शेतकऱ्यांचे वीज कापत असते. लोक संघर्ष मोर्चा जळगावनी दाखल केलेल्या याचिकेमुळे शेतकऱ्यांची वीज कापता येणार नाही असा आदेश अन्न सुरक्षा आयोगाने दिला आहे. येणाऱ्या रब्बी सिझनमध्ये आपल्या शेतकऱ्यांची वीज कापली जाणार नाही यासाठी MSEB ला तंबी देणे गरजेचे आहे.
यासोबतच MSEBचे कर्मचारी व अधिकारी मुजोरपणे वागत असतात, ग्राहकांना लूटून ग्राहकांच्याच मानगुटीवर बसतात, यांच्यावर ना कुण्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण, ना लोकप्रतिनिधींचे नियंत्रण. डीपीचे मेंटनन्स वेळेत केले जात नाहीत, अनेक ठिकाणी तर शेतकरीच पैसे गोळा करून मेंटनन्स करतात, अर्ज विनंत्या करूनही वेळेवर पोल वा नवीन DP बसवले जात नाहीत. अशा अनेक अडचणीतून शेतकरी जात असताना MSEB मात्र आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करते आहे.
म्हणून अशा या महावितरण कंपनीच्या विरूद्ध आवाज संघटीत करणे गरजेचे आहे. उद्या शुक्रवार, दि. 4 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 11 वाजता MSEB कार्यालय, तहसील जवळ, देगलूर येथे देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने जमावे ही विनंती करण्यात आली