
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- तालुक्यातील आपले सरकार सेवा प्रकल्पातील सर्व ग्रामपंचायत संगणक परीचालकांना सुधारीत आकृतीबंधानुसार पद निश्चित करुन कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन साहेब यांच्या कडे नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्फत निवेदन देऊन मागणी केली असता.खासदार साहेब यांनी ग्रामविकास मंत्र्यांना सांगितले की बारा वर्षांपासून संगणक परीचालक काम करीत असून महाराष्ट्र डिजिटल करण्याचे काम संगणक परीचालकांनी केले आहे.खासदार साहेबांनी सविस्तर सांगितल्यामुळे ग्रामविकास मंत्र्यांनी संगणक परीचालक यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत.लवकरच मिटिंग घेऊन सर्व ग्रामपंचायत संगणक परीचालकांच्या मागण्या मान्य करण्यात येतील असे ग्रामविकासमंत्री ना.गिरीश महाजन यांनी सांगितले.त्यांनी व खासदार साहेबांनी संगणक परीचालकांच्या मागण्या मान्य केल्या बद्दल कंधार तालुका महाराष्ट्र राज्य संगणक परीचालक संघटनेचे सचिव श्री.गजानन जाधव, श्री.बोईनवाड मामा, श्री.अनिल राठोड व सर्व संगणक परीचालक संघटनेच्या वतीने ग्रामविकासमंत्री व खासदार साहेब यांचे आभार मानले आहेत.