
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी भंडारा- संभाजी गोसावी
भंडारा जिल्हा पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांचे स्थानांतरण झाले असून. त्यांच्या जागी कर्तव्यदक्ष ईश्वर कातळकडे यांची नियुक्ती करण्यांत आली. नूतन अप्पर पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ शुक्रवारी भंडारा जिल्हा पोलीस मुख्यालयांत हजर राहून अनिकेत भारती यांच्याकडूंन पदभार स्वीकारला. मावळते अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यांतील तीन अप्पर पोलीस अधीक्षकांचे स्थांनातरणही करण्यांत आले असून.यामध्ये भंडारा येथील अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांचा देखील समावेश आहे अद्याप त्यांच्या नियुक्तीचे ठिकाण निश्चित करण्यांत आले नसून पदस्थापनेचे आदेश स्वतंत्ररित्या काढण्यांत येणार असल्यांचे बदल्या आदेशांत स्पष्ट करण्यांत आले आहे. भंडारा जिल्ह्याचे तीन वर्षांपूर्वी माजी अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्याकडून अनिकेत भारती यांनी अप्पर पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्या कार्यकाळामध्ये विशिष्ट कार्यवाहीने त्यांनी गुन्हेगारीवर आपला चांगलाच वचक निर्माण केला होता. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यांत घडलेल्या अनेक आव्हानात्मक गुन्हे उघडकीस आणले. अनिकेत भारती यांनी माजी तत्कालीन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, माजी पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या समवेत भंडारा जिल्ह्यांत त्यांचा कार्यकाळ उत्कृंष्ट राहिला.अनिकेत भारती यांच्यानंतर आता ईश्वर कातकडे भंडारा जिल्ह्यांचे नूतन अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नुकतेच रुजू झाले असून त्यांची पोलीस प्रशासनांत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची चांगलीच ओळख आहे. नूतन अप्पर पोलीस अधीक्षकांनी भंडारा जिल्ह्यांची सूत्रे हाती घेताच सातारा जिल्ह्यांचे विद्यमान प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी यांनी नूतन अप्पर पोलीस अधीक्षकांचे सोशल मीडियावरुन अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.