दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी.
पुणे जिल्ह्यांतील आंबेगाव तालुक्यांतील लौकी गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्य दलातील कार्यरत असणारे आरआईपी जवान सुधीर पंढरीनाथ थोरात( वय ३२) हे मध्यप्रदेश-ग्वालिया येथे कर्तव्यावर असताना शहीद झाले. सुधीर हे अचानक गेल्यांने त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनांची बातमी येताच घराबाहेर मोठा जनसागर उपस्थित झाला होता. सुधीर थोरात हे २०१४ पासून भारतीय सुरक्षा फोर्समध्ये कार्यरत होते. त्यांना घोडेस्वारीमध्ये अनेक सुवर्णपदके मिळाली होती. तसेच पुढील दोन दिवसांत ग्वालियर या ठिकाणी घोडेस्वारीच्या इंटरनॅशनल स्पर्धा होणार होत्या. मात्र त्या स्पर्धेचा सरावदरम्यान रविवारी दुपारी तीनच्या सुमारांस त्यांचे घोड्यावरुन पडून घोड्याची टाप अचानक त्यांच्या डोक्यांला लागली यात त्यांचे जागीच निधन झाले.त्यांच्या अचानक जाण्यांमुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. फौजी सुधीर यांच्या पश्चांत आई, वडील ,पत्नी दीड वर्षाचा मुलगा तीन विवाहित बहिणी असा त्यांचा परिवार होता. शहीद जवान सुधीर थोरात यांच्या निधनांची बातमी समजताच सातारा जिल्ह्यांचे लोकप्रिय प्रतिनिधी यांनी पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतील मंचर पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली.
