दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी : जब्बार मुलाणी
—————————————
पुणे महानगरपालिकेच्या मुख्य कामगार अधिकारी व कामगार कल्याण विभागात कोट्यावधी रुपयांच्या गैर व्यवहाराच्या भ्रष्टाचार बोकळला आहे.पैसे द्या बदली घ्या पैसे द्या पाहिजे तिथे पोस्टिंग मिळवा पैसे द्या अतिरिक्त पदभार मिळवा पाहिजे तो पदभार मिळवा असे आजच्या पुणे महानगरपालिकेची स्वरुप झालेले आहे.पुणे महानगरपालिका सेवा नियम 2014 मधील सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरणांतर्गत नमूद असलेल्या शैक्षणिक व अनुभवाच्या पात्रात नसताना देखील पैशाच्या बोलीवर कोट्यावधी रूपयांचे गैरव्यवहार सुरू आहेत.

सामान्य प्रशासन विभागात बदली पदोत्रती आणि पदस्थापना मध्ये अक्षरशः पदांचा बाजार भरला आहे.बांधकाम, टॅक्स विधी कामगार कल्याण सा,प्रवि आकाश चिन्ह विभागात तर 20 लाखापासून पदांची बोली लागते विधी कामगार विभागातील अभिप्रायांसाठी 5 लाखापासून बोली लागते विभागाने एका टी डी आर एफएसआय प्रकरणात सुमारी दीड कोटी रुपये घेतल्याचे ऐकिवात आहे. या सर्व गंभीर समस्येवर पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर संविधान परिषदेचे हलगी बजाव धरणे आंदोलन सुरू असून जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयातील सरन्यायाधीशामार्फ चौकशी होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय आंदोलनातील संघटनांनी व्यक्त केलेला आहे.
