दैनिक चालू वार्ता पेठवडज सर्कल प्रतिनिधी- आनंदा वरवंटकर
सावरगाव :- कंधार तालुक्यातील सावरगाव -कळकावाडी-मंगनाळी-वरवंट या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून जवळपास विस ते पंचवीस वर्षांपासून हा रस्ता अडगळीत पडलेला होता.दैनिक चालू वार्ता पेपर मध्ये अनेक वेळा मागणी करण्यात आली होती.परीसरातील नागरिकांना मुखेड, नांदेड,नर्सी, नायगाव,मारतळा, जाण्यासाठी सोयीचा आहे.त्यामुळे प्रशासनास अनेक वर्षांपासून हा रस्ता बनवण्याची मागणी करण्यात आली होती.सर्व पुल व रस्ता बनवण्याचे काम जोरात सुरू आहे.त्यामुळे आता प्रवाशांना वेळ व पैसा वाचेल आणि प्रवास सुखकर होईल असे सावरगाव, कळका,कळकावाडी, मंगनाळी, वरवंट येथील नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
