
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या समाधी विषयी अफवा पसरसमाजात तेड निर्माण करणाऱ्या विरुध्द कायदेशिर कारवाई करुन अटक करणे
राष्ट्रसंत सदगुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची संजीवन समाधी भक्तीस्थळ अहमदपूर येथे असून या समाधी विषयी अफवा पसरुन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. त्यात माधवराव बरगे, बबन हैबतपुरे, व्यंकटराव मुद्दे, सुभाष सराफ, शकराव मोरगे, संदीप डाकुलगे, आदीचा समावेश असून मागे दिनांक १० सप्टेंबर रोजी अशाच प्रकारची अफवा पसरुन सामाजिक स्वास्थ बिघडण्याचा प्रयत्न केला होता.
हे की, भक्तीस्थळचे नविन विश्वस्त मंडळ कार्यरत असून त्यांच्यामार्फत व शिवा संध्शटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे सर यांच्यासह केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब व केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत समाधी मंदीर भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे.
हे की, हजारो भाविकांच्या उपस्थितीत सदर समाधी मंदीर बांधकाम चालू झाले असून या बांधकामात सदर वरील व्यक्तीचा विरोध असून आपण बांधकाम थांबवता येत नाही मात्र प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी सदर बातम्या प्रसारीत केल्या जात आहेत.
. हे की, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी त्यांचे उत्तर अधिकारी राजशेखर गुरु शिवलिंग महारात यांची नेमणूक केली असून त्यांचे अज्ञान पालक म्हणून आचार्य गुरुराज स्वामी महाराज हे सदर भक्ती स्थळाचे काम पाहात आहेत मात्र या व्यक्तीस भक्तीस्थळावर झालेली प्रगती पहावत नाही व राष्ट्रसंतांनी दिलेला उत्तर अधिकारी ही मान्य नाही म्हणून असे प्रकार केले जात आहेत.
हे की, राष्ट्रतसंच्या अस्थि चोरुन निवेदन सदर व्यक्तीने दिले असून लिंगायत समाजात समाधी हा असतो आणि सदर समाधी भक्तीस्थळावर असून त्या भोवतीचे दगडी बांधकाम मागील आठ ते दहा दिवसापासून चालू आहे हे असतानाही जाणून बुजून सामाजिक स्वास्थ बिघडण्यासाठी व राष्ट्रसंताची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रकार केला जात आहे हे की राष्ट्रसंताच्या हच्छाप्रमाणे समाधी मंदीर दगडी असावे व त्यात लोखंडाचा समावेश केला जाऊ नये अशी त्यांची इच्छा असताना व ती अनेक भक्तांना त्यांनी बोलून दाखवले आहे त्यांच्या इच्छप्रमाणे हजारो भाविकांच्या उपस्थितीत सदर समाधी मंदीराचे बांधकाम सुरु केले असून ते अनेक दिवस चालणार आहे त्यामुळे समाधी मंदीर होऊ नये याबाबत प्रशासकीय यंत्रणेने अडथळा करावा म्हणून सदर निवेदन दिल्याचे दिसून येते.*त्यावेळी देगलूर येथील शिवा संघटना शहराध्यक्ष रुपेश पाटील भोकसखेडकर,शिवा संघटना तालुका अध्यक्ष अशोकराव मजगे,अशोक पाटील,राजेश्वर कुरुडगीकर,मनोज दोंतुलवार,अशोक धर्माजी,गणेश मैलापुरे शिवा संघटना महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष वर्षा देशमुख,शहराध्यक्ष रेखा देवाडे,ललिता मठपती,शांताबाई देवणे,पदमा पाटील,ललिता कल्पे,काशीबाई उमाटे आदी शिवा संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते*