
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर–
पुणे येथे कृषी, पर्यावरण व पर्यटन विकासासाठी कार्यरत असणाऱ्या परभन्ना फाऊंडेशन व विश्व अँग्रो ट्यूरिझम तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण व परिवर्तनशील कार्य करणाऱ्या मान्यवरांची निवड करून पुरस्कार दिले जातात. सन 2022 वर्षीचा कृषी सेवाकार्य कृतज्ञता पुरस्कार हा देगलूर व परिसरात मागील सात आठ वर्षांपासून जलसंवर्धन, शेती व ग्रामीण विकासासाठी कार्यरत असलेले शेतकरी नेते कैलास येसगे कावळगावकर यांना अनेक मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्रामुख्याने पुणे विद्यार्थी गृहाचे सुनिल रेडेकर, यशदाचे डाँ. बबन जोगदंड, कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डाँ. महेश ठाकूर, लोकशाही संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक पी.आर. सोनवणे व निमंत्रक गणेश चप्पलवार व सुर्यकांत पोतूलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
पुणे विद्यापीठात उच्चशिक्षण घेऊन पुण्यात चांगली नोकरी असताना ती सोडून आपल्या मातीचे रूण फेडण्यासाठी, आपल्या परिसराच्या विकासाचे स्वप्नं उराशी बाळगून कैलास येसगे गावाकडे जाऊन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी करत असलेले कार्य हे सामाजिक क्षेत्रातील अनेक तरूणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे गौरव उदगार यावेळी डाँ. महेश ठाकूर यांनी काढले. यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे, अभिनेता कपिल कांबळे गूडसूरकर, पर्यावरणप्रेमी लेखक बसवंत विठाबाई बाबाराव, पत्रकार रामचंद्र भंडरवार यांचाही सन्मान करण्यात आला.
कैलास येसगे यांच्या प्रामाणिक कार्याची योग्य दखल घेऊन उचित सन्मान केल्याबद्दल अनेक स्तरातून कैलास येसगे यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.