दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
ईस्लापूर दि. १७ हिंदुहृदय सम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिना निमित्त इस्लापूर, शिवणी सर्कलच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कडवट शिवसैनिकां कडून इस्लापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.
प्रथमता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश करेवाड, माधव बैलवाड, बालाजी पेशवे व संजय गिरी यांच्या हस्ते पूजन करुन प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन चरित्रावर शिवाजी जाधव, तुकाराम बोनगीर यांनी सखोल मत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमास ग्रा.प सदस्य प्रशांत डांगे. तुकाराम बोनगीर
चंद्रकांत पाकलवाड, शिवसेना शहरप्रमुख अवधूत सोळंके, माजी सर्कल प्रमुख साहेबराव पळसपुरे, युवा सेना सर्कल प्रमुख साईनाथ बैलवाड, सचिन पाटील, विनोद चव्हाण, शीलवंत कांबळे, अविनाश चव्हाण, शुभम पेशवे, विकास बैलवाड, ऋषिकेश कदम, जनार्दन गरुडकर यासह इस्लापुर, शिवणी सर्कल मधील सर्व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक उपस्थित होते.
