दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
उस्माननगर येथून जवळच असलेल्या लोहा तालुक्यातील जोशीसांगवी येथील सेवासहकारी सोसायटीच्या प्रशासकीय चेअरमन पदी सौ.सुवर्णा संजय मोरे यांची निवड करण्यात आली.
लोहा तालुक्यातील नियमित नियतनमान कालावधी संपल्या व निवडणूका न झालेल्या लोहा तालुक्यातील जोशीसांगवीची निवड झाली नव्हती म्हणून या गावच्या सहकारी सोसायटीच्या प्रशासकीय मंडळावर नांदेड चे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपले वजन वापरून सौ.सुवर्णा संजय मोरे याची निवड करण्यात आली.
या निवडीमध्ये सौ.सुवर्णा संजय मोरे ( प्रशासकीय चेअरमन )बबन बाबाराव मोरे,बाळासाहेब बाबाराव मोरे,दिगंबर मोतीराम पोकले, दिगंबर जळबा भुसेवाड, भगवान माधवराव गजभारे,नामदेव बालाजी मोरे यांची प्रशासकीय सदस्य पदी निवड करण्यात आली.यास नांदेड जिल्ह्याचे भाग्यविधाते ,लोकनेते,लोकप्रिय खासदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्य प्रणिता देवरे – चिखलीकर, देविदास राठोड, लोहा पंचायत समिती सभापती आनंदराव पाटील शिंदे,भाजपा कार्यकर्ते सुरेश मामा बास्टे,संजय मोरे हे उपस्थित होते. यांच्याकडून नविन प्रशासकीय चेअरमन, सदस्य यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
