दैनिक चालू वार्ता रायगड प्रतिनिधी -प्रा. अंगद कांबळे
म्हसळा – संत गाडगेबाबा ग्राम स्वछता अभियान अंतर्गत म्हसळा तालुक्यातील वरवठने गणातुन ग्रुप ग्रामपंचायत मांदाटणे या ग्रामपंचायत ने शासनाच्या नियमांतर्गत जे गूण 200 पैकी 174 गुण मिळवून प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिंकल्याचे काल बाल दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सर्व कामाची पाहनी केल्या नंतर समिती चे प्रमुख रविकिरण गायकवाड साहेब यांनी 50
हजार आणि 10हजार असे एकूण 60 हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.
सन 2018 पासूनच मांदाटणे ग्रामपंचायत ने पंचक्रोशीतील प्राथमिक, माध्यमिक, शाळा, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थांच्या सर्वांच्या सहकार्याने नियोजन बद्ध कार्यक्रम, उपक्रम घेऊन स्वछता, आरोग्य, पर्यावरण, असे अनेक उपक्रम यशस्वी करून दाखवले. शासकीय योजनाणा लोक चळवळ चे स्वरूप देऊन एक उच्च शिक्षित सरपंच गावाचा कसा विकास करू शकतात याचे मूर्तिमंत उदाहरणं म्हणजे सरपंच चंद्रकांत पवार होय.
ज़िल्हा समिती प्रमुख रविकिरण गायकवाड साहेब यांचे सोबत, नाईक साहेब, नागे साहेब, म्हसळा सहा. गट विकास अधिकारी मंगेश साळी साहेब, माजी सभापती बबन मनवेसाहेब, यांनी ग्रामपंचायत ने केलेल्या कामाची पाहणी केली. आणि ज़िल्हा स्तरीय साठी महत्वाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक आदर्श शिक्षक विनयकुमार सोनवणे सर यांनी केले तर आभार ग्रामसेवक ठाकरे यांनी केले.
आजच्या या यशामध्ये ग्रामस्थ , विद्यार्थी, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांचा मोठा सहभाग आहे अशी भावना या वेळी सरपंच चंद्रकांत पवार यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याचे औचित्य साधून म्हसळा पोलीस ठाण्यात सरपंच आणि उपसरपंच पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष गाव विकास समिती इतर विषय घेऊन यांची मिटिंग (सभा ) घेण्यात आली या वेळी मांदाटने ग्रामपंचायतचे सरपंच मा. चंद्रकांत पवार यांच्या म्हसळा पी एस आय मा. संदिपान सोनावणे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
