दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी धुळे- संभाजी गोसावी.
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा मच्छिंल भागात हिमखानालयांत तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला यामध्ये महाराष्ट्रांतील तीन पत्रांना वीरमरण प्राप्त झाले यामध्ये धुळे जिल्ह्यांतील चिंचखेडा गावचे सुपुत्र मेजर मनोज लक्ष्मण गायकवाड यांना वीर म्हणून प्राप्त झाल्यांचे उघड झाले. काश्मीरमधील मच्छिंल कुपवाडा येथे काल मोठ्या प्रमाणावर हिम खलनायांत हे तिन्ही
जवान शुक्रवारी सायंकाळी गस्त घालत असताना अचानक
बर्फाचा मोठा तुकडा लष्करांच्या जवानांवर पडला. प्राथमिक माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी झालेल्या घटनेत बर्फाच्या तुकड्याखाली पानजन दबावले गेले त्यापैकी दोघांना सुखरूप बाहेर काढण्यांत यश आले. मात्र अन्य तिघां जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मेजर मनोज गायकवाड ( वय ४२) हे २००२ साली भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. लष्करांच्या ५६ राष्ट्रीय रायफल बॅचचे हे जवान होते. मनोज गायकवाड यांच्या पश्चांत पत्नी, मुलगा, मुलगी आई ,वडील व दोन भाऊ असा त्यांचा परिवार होता. देशाची सेवा करत असताना त्यांना विरमरण प्राप्त झाले घटनेची माहिती त्यांच्या मूळगावी धुळे जिल्ह्यांतील चिंचखेडा गावात पसरताच गावामध्ये शोककळा पसरली. धुळे जिल्ह्यांतील प्रशासकीय अधिकारी व पोलीस प्रशासन तसेच राजकीय क्षेत्रांतील मान्यवर व मित्रपरिवार ग्रामस्थ यांनी मेजर मनोज गायकवाड यांच्या घरासमोर जनसमुदाय उपस्थित झाला होता. सोमवारी सकाळी मेजर मनोज गायकवाड यांचे पार्थिंव त्यांच्या मूळगावी चिंचखेडा येथे येणार असल्यांची माहिती चिंचखेडा गावचे पोलीस पाटील केतन पवार यांनी दिली.
