दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
बाळासाहेबांच्या शिवसेना शाखेचा पहिला मान लोहयाला मिळाला तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार व शहरप्रमुख युवराज वाघमारे यांचे अभिनंदन करतो असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते तथा नांदेड- हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आनंदराव पाटील जाधव यांनी लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या शाखेचे उद्घाटन प्रसंगी केले.
बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात मिलिंद पाटील पवार व युवराज वाघमारे यांनी नुकताच काही दिवसांपूर्वी प्रवेश केला होता पक्षाने मिलिंद पाटील पवार यांच्यावर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या लोहा तालुकाप्रमुख पदी निवड केली तर युवराज वाघमारे यांची लोहा शहरप्रमुख पदी निवड केली.
बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या लोहा तालुकाप्रमुख पदी मिलिंद पाटील पवार व शहरप्रमुख पदी युवराज वाघमारे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी लोहा शहर व तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या शाखा उघडण्याचा धुमधडाका सुरू केला असुन दि. १९ नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची शाखा लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, रमणा तांडा देवणेवाडी रोड , कंधार रोडवरील गोळेगाव पाटी या ठिकाणी लोहा तालुक्यातील शाखा उघडण्यात आल्या.
यावेळी शिवसेना उपनेते तथा नांदेड-हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव पाटील जाधव, नांदेड जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांचे शाल पुष्पहार घालून फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करून भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवसेनेच्या महिला संपर्कप्रमुख रत्नमालाताई मुंडे, लोहा तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार, शहरप्रमुख युवराज वाघमारे, तालुका संघटक प्रभाकर राऊत, शहर संघटक संदीप पवार,शहर समन्वयक संतोष शेंडगे , उपशहरप्रमुख माधव राठोड, विकास पाटील,साहेबराव हरगावकर, संदीप राठोड, यांच्या सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
तसेच लोहा तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या शाखेचे अनावरण केल्यानंतर कंधार येथील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या शाखेचे उद्घाटन संपर्कप्रमुख आनंदराव पाटील जाधव व जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर लोहा व कंधार तालुका बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना संपर्क प्रमुख आनंदराव पाटील जाधव म्हणाले की,मी लोहयाला संपर्क प्रमुख असताना धोंडे सर सोबत शाखा स्थापन करायचो व गावोगावी जायाचे मिलिंद पाटील पवार यांनी चांगले भाषण केले.
ही बाळासाहेबांची शिवसेना आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ची शिवसेना आहे.दिलेला शब्द पाळणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत.सरकार आपले आहे तुम्ही खंत व्यक्त केली आहे. मी बाळासाहेबांच्या साक्षीने सांगतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सोबत तन मन धनाने आहेत. कंधार व लोहा येथे बाळासाहेबांचे शिवसैनिक है नगरसेवक म्हणून जातील . पक्षाने आपल्याला काय दिले प्रेम दिले. येथील शिवसेना तळागाळापर्यंत जाऊन वाडी तांड्यावर प्रत्येक गावात शाखा स्थापन करायची आहे. पीक विम्याचे काम आहे माझ्याकडे दोन जिल्हे आहेत.हे गोरगरीबांचे सरकार आहे त्यांच्यासोबत जायाचे आहे. आपल्याला १८-१८ तास काम करणारा मुख्यमंत्री मिळाला आहे. गावागावातून शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसैनिक जोडला गेला पाहिजे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह हे पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना यांना मिळेल.
तसेच या भागातील कलंबर साखर कारखाना हा खा. हेमंत पाटील यांनी घेतला असून त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना व भागातील नागरिकांना रोजगार ही मिळेल असे आनंदराव पाटील जाधव म्हणाले.
तसेच यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर म्हणाले की, येथे भगवा फडकावयचा आहे. लोहा व कंधार न.पा.त आपले किमान ५-५ नगरसेवक निवडून येतील.
तसेच यावेळी शिवसेना लोहा तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार म्हणाले की शिवसेनेवर प्रेम करायचे ते तुम्ही शिकविले आहे. स्वतः च्या जीवावर हा कार्यक्रम केला आहे. आम्हाला लोहा व कंधार न.पा.ची निवडणूक लढवायची आहे. न.पा. मध्ये जायाचे आहे. आम्हाला निधी द्या पहिला कंधार ला निधी दिला होता तो काही कारणाने वापस गेला आहे तसेच लोहा -कंधार मध्ये बाळासाहेबांची शिवसेना अधिक मजबूत करणार असे मिलिंद पाटील पवार म्हणाले.
तसेच यावेळी कंधार तालुकाप्रमुख धनराज उर्फ बाळासाहेब पाटील लुंगारे म्हणाले की, आमच्यावर कुणी टिका करु नये जशास तसे उत्तर देण्यात येईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते ही आहे कंधारचा मुख्य रस्ता खराब झाला असुन या रस्त्यासाठी निधी द्यावा व आगामी कंधार न.पा. निवडणूक बाळासाहेबांची शिवसेना सर्व ताकदीनिशी लढविणार असे धनराज उर्फ बाळासाहेब पाटील लुंगारे म्हणाले.
यावेळी लोहा व कंधार तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपजिल्हाप्रमुख मारोती एजगे यांनी केले.
