दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
============================
मराठवाडा शिक्षक संघाचे अधिकृत बिनविरोध उमेदवार सूर्यकांत संग्राम विश्वासराव यांच्या प्रचार पत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन
============================
नांदेड येथील शिक्षक नेते तथा शिक्षक प्रतिनिधी मराठवाडा शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार सूर्यकांत विश्वासराव सर यांच्या राज कॉर्नर पूर्णा रोड येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजी कार्यक्रमाचे उद्घाटक भाई गुरुनाथ रावजी कुरुडे माजी आमदार तथा सचिव श्री शिवाजी मोफत सोसायटी कंधार, पी एस घाडगे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक मराठवाडा शिक्षक संघ, माजी आमदार गंगाधर पटणे संस्थापक अध्यक्ष आंतरभारती शिक्षण संस्था बिलोली, मधुकरराव कुरुडे, माझी उपमहापौर मनपा नांदेडचे सतीश देशमुख, उल्हास मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रेय कुरुडे, माझी प्राचार्य उदगीर सर, यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य निवडणूक जानेवारी फेब्रुवारी 2023 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ मराठवाडा शिक्षक संघाचे अधिकृत बिनविरोध उमेदवार सूर्यकांत संग्राम विश्वासराव यांच्या प्रचार पत्रकाचे विमचन करण्यात आले
शिक्षकांच्या समस्या सभागृहात मांडण्यासाठी संघटनेचा उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे मागील पंधरा वर्षापासून शिक्षकांचा कोणीही वाली नव्हता म्हणून सरकार दरबारी शिक्षण विषयक तथा शिक्षकासंबंधी अनेक अमाणूस कायदे सरकारने केले आहेत सरकारला जाब विचारण्यासाठी शिक्षकाची बाजू घेऊन लढणारा कोणी वाली नव्हता म्हणून सरकारचे चालले ,आता आपणास आपल्या हक्कासाठी लढणारा शिक्षक नेता मिळाला आहे आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहून शिक्षकांचा बुलंद आवाज विश्वासराव सरांच्या माध्यमातून विधान परिषदेत पोहोचण्यासाठी प्रचार व प्रसार संपर्कसाठी सदर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात असल्याचे यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे मराठवाडा अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक आनंद करणे यांनी केले कार्यक्रमास नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातून मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारी यांच्यासह शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती
