दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम:- वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथील उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शामराव भोसले यांना राज्यस्तरीय आदर्श नेता राजरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने दरवर्षी सामाजिक,शैक्षणिक, संस्कृतीक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना राज्यस्तरीय गुणिजन पुरस्कार दिले जातात. त्यात शामराव भोसले त्यांची देखील निवड झाली होती. हा पुरस्कार सोहळा २० नोव्हेंबर २०२२ रोजी पुणे येथील हॉटेल पूनम च्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. मानाचा फेटा सन्मानपत्र सन्मानचीन्ह गौरव पदक मानकरी बॅच असे पुरस्काराचे स्वरूप होते. समारंभ अध्यक्ष प्रेरक वक्ता व शिक्षणतज्ञ सौ. मनीषा कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदिकर आणि समारंभाच्या विशेष पाहुण्या म्हणून सौ. मोनिका यशोद व विशेष पाहुणे म्हणून तात्यासाहेब रसाळ सुप्रसिद्ध समाजसेवक उपस्थित होते.याप्रसंगी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील व्यक्तीना राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.शामराव भोसले यांना हा राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याने अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी मित्र परिवार, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
