दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सोलापूर- संभाजी गोसावी.
आयएएस शितल तेली-उगले यांनी सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास सोलापूर महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. सोलापूरच्या इतिहासांमध्ये त्या पहिल्यांच महिला आयुक्त आहेत. त्यांनी आजवर पुणे, नागपूर चंद्रपूर, रायगड अशा विविध जिल्ह्यांमध्ये आपली सेवा बजावली आहे. सोमवारी सकाळी आयुक्त शितल तेली-उगले यांचे महानगरपालिका मध्ये आगमन झाले. यावेळी औक्षण करुन त्यांचे स्वागत करण्यांत आले याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थिंतीत होते. शितल तेली-उगले या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यांच्या आहेत. त्यांचे शिक्षण पुणे सर परशुरामभाऊ कॉलेजमध्ये झाले तर त्यांचे पती डॉ. बसवराज तेली हे आयपीएस असून सध्या सांगली जिल्ह्यांमध्ये ते पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. २००७ साली दिलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगांच्या परीक्षेत यश मिळवून शितल तेली-उगले यांना आयआरएस म्हणजेच भारतीय महसूल सेवेत संधी मिळाली. त्यानंतर प्रशिक्षण कालावधी सुरु असतानाच पुन्हा केलेल्या प्रयत्नांमध्ये त्यांना २००९ आयएएस म्हणजेच भारतीय प्रशासकीय सेवेत यश मिळाले. देशात त्यांचा ३७ रॅक त्या महाराष्ट्रांत टॉपर होत्या. सध्या त्या नागपूर येथे वस्त्रोद्योग संचालक या पदावर कार्यरत असताना त्यांची बदली सोलापूर महापालिकेच्या आयुक्त पदावर करण्यांत आली त्या सोलापूर महापालिकेच्या पहिल्यांच महिला आयुक्त आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये त्या शिस्तप्रिय आयएएस अधिकारी म्हणून त्यांची चांगलीच ओळख आहे. सांगली जिल्ह्यांचा नुकताच पदभार स्वीकारलेले नूतन पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या त्या पत्नी आहेत. निर्वाचित आयुक्त शितल तेली-उगले मॅडम यांनी पदभार घेताच पत्रकारांशी यावेळी त्यांनी संवाद साधला त्यापुढे म्हणाल्या सोलापूर शहरवासीयांचे जीवन सुखकर करण्यासाठी माझा नक्कीच प्रयत्न राहील तसेच सोलापूर शहराचा कायापालट बदलण्यांचा माझा नक्कीच प्रयत्न राहील अशी ठाम ग्वाही निर्वाचित आयुक्त शितल तेली-उगले यांनी दिली.
