
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा- संभाजी गोसावी
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यांतील गुन्हेगारी पाळेमुळे उघडण्यांस चांगली सुरुवात केली असून. यामध्ये आता तडीपरीचा पहिलाच दणका दिला असून काही दिवसापूर्वीच एएम कंपनीला मोक्का लावून ठोकले. असतानाच आता कराड मधील तिघांना तडीपार करुन टाईट केले आहे. अवैध-धंदे उध्वस्त करताच गुन्हेगारी पार्श्वभूमीचा बिमोड करण्यांचा त्यांनी चांगलाच निर्णय घेतला आहे. जिल्हा सातारा जिल्हा क्रांतिकारांचा जिल्हा असून अनेक ऐतिहासिक घटनांनी सातारा जिल्ह्यांची चांगलीच ओळख आहे. मात्र अशा साताऱ्यांत अनेक गुन्हेगारींच्या टोळ्यांनी दहशत माजवली होती. आताही काही गुन्हेगार दहशत माजवत आहेत यापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप जी पाटील यांनी गुन्हेगारीवर वचक निर्माण केला होता. तडीपारी कारवाईचे शतक त्यांनी चांगलेच पार केले होते. त्यांनी शेकडो गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख तेजस्विनी सातपुते अजयकुमार बन्संल यांनीही गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी धाडसी पाऊले उचलली होती. आता सातारा जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक पदावर धडाकेबाज समीर शेख यांची नियुक्ती झाल्यांने पुन्हा एकदा शांतताप्रिय सातारा जिल्ह्यांच्या पाललवीत झाली आहे. समीर शेख यांनी पदभार स्वीकारताच अवैध-धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तसेच त्यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या कारभाऱ्यांना जुगार मटका अड्ड्यांवर कारवाई करण्यांचे आदेश आदेश देण्यांत आले आहेत. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यांची गुन्हेगारी समीर शेख यांच्या कर्तव्यदक्ष सेवेमुळे बिमोड होणार