
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे.
देगलूर (प्रतिनिधी)नवतरुणांनी जास्तीत जास्त मतदान अभियानात सहभागी होऊन मतदान नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी केले. तसेच भाजपाच्या फ्रेंड्स ऑफ बिजेपी या अभियानात सहभागी होण्याचे व्हावे, असेही ते म्हणाले.
भाजपाच्या मतदार नोंदणी अभियान व फ्रेंड्स ऑफ बीजेपी या अभियानाच्या रथगाडीचे उद्घाटन गोजेगावकर यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजी मामा कनकटे, प्रकाश पाटील बेंबरेकर, अवधूत भारती सुगावकर, शिवराज पाटीलमाळेगावकर, संतोष पाटील गोजेगावकर, अशोक गंदपवार, अशोक कांबळे, अशोक साखरे, पुलुचवाड सुगावकर, चिलवार गुरुजी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती यादवराव फिरंगे, नाईक मनसकरगेकर, बालाजी पाटील सकरगेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. ज्या नव तरुणांचे वय १८ वर्षे व त्यापेक्षा जास्त झाले आहे, अशा नव तरुणांनी या फिरत्या अभियानाचा लाभ घेऊन जास्तीत जास्त मतदार नोंदणी करुन घ्यावी तसेच भाजपाच्या फ्रेंड्स बीजेपी या अभियानात सहभागी होऊन केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत
पोहोचवण्याचे आवाहनही
गोजेगावकर यांनी केले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव कानकटे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करुन या अभियानात जास्तीत जास्त तरुण व नागरिकांना सहभागी करुन घेण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील माळेगावकर यांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रास्ताविकात अशोक लालू कांबळे यांनी या अभियानामागची भूमिका विशद करुन तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन उपस्थितांचे आभार सुरेश जाधव यांनी मानले.