
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर;महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र देगलूर येथे आज दिनांक 16 /12 /2022 रोजी प्रशासकीय गतिमानता अभियाना अंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी नोंदणीक्रत बांधकाम कामगाराच्या पाल्यांना परीक्षा पॅड वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
अध्यक्ष म्हणून सौ.पी.एस स्वामी मॅडम (शिक्षिका जिल्हा परिषद शाळा देगलूर)व प्रमुख पाहुणे म्हणून श्री. बी.बी जाधव (शिक्षक जिल्हा परिषद शाळा देगलूर )यांच्या हस्ते इमारत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना परीक्षा पॅड वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास इमारत बांधकाम कामगार श्री अशोक शेरे, गोवर्धन सून्नपवार, उमाकांत हसगुडे, अब्दुल अन्सारी ,योगेश गणलवार, नबी शेख, बालाजी स्वामी,ओमनाथ कुंटुरे ,आदी उपस्थित होते व कामगार कल्याण मंडळांची योजनांची व उपक्रमाची माहिती देण्यात आली सदरील कार्यक्रम नांदेड गटाचे कामगार कल्याण अधिकारी श्री प्रसाद धस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला हा कार्यक्रम घेण्यासाठी कामगार कल्याण केंद्र देगलूर चे कर्मचारी सौ .बिरादार मॅडम सौ. मैलागीरी मॅडम व श्री व्ही.बी. स्वामी उपस्थित होते