
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- दादरा नगर हवेली आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत जव्हार तालुक्यातील डुंगाणी येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग डहाणू यांनी एका वाहनावर ११ लाख ५० हजार रुपयांची अवैध दारू वाहतूक करतांना पकडली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूची विक्री व वाहतूक वाढणार या निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत भागात ग्रस्त वाढवली होती.
गुरुवारी डुंगाणी येथे एका चार चाकी वाहनातून ४६ बॉक्स विदेशी मद्याची अवैध वाहतूक करताना पकडण्यात आले आहे.अंधाराचा फायदा घेत वाहन चालक आरोपी वाहन सोडून पसार झाला असून वाहनात असलेला मुद्देमाल व वाहन असे अकरा लाख ५० हजारांचा साठा जप्त करण्यात आला आहे.या कारवाईदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभाग डहाणूचे निरीक्षक महेश धनशेट्टी यांच्या देखरेखी खाली ही मोठी कारवाई करण्यास राज्य राज्य उत्पादन शुल्क विभाग डहाणू यांना मोठे यश आले आहे.