
दैनिक चालू वार्ता राजगुरूनगर ता. प्रतिनिधी- मयुरी वाघमारे
===================
राजगुरूनगर :- राजगुरूनगर ता. खेड, जि. पुणे.
दि :- 16/12/2022
आज राजगुरूनगर येथे आमदार दिलीप मोहित पा. यांचा विशेष प्रयत्नातून खेड पोलीस स्टेशन राजगुरूनगर नवीन तीन मजली इमारती साठी रुपये 3 कोटी 77 हजार निधी मंजूर केला होता.
खेड पोलीस स्टेशन साठी नवीन इमारत बांधने या कामाचा भूमिपूजन समारंभ आज शुक्रवार दिनांक 16/12/2022 रोजी स.10 वा 10 मि. या वेळेवर अंकिता गोयल (पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण) यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच या कार्यमाचे अध्यक्ष मा. दिलीप मोहिते पा. (विधानसभा सदस्य खेड आळंदी विधानसभा मतदार संघ )
प्रमुख पाहुणे :-मा. श्री. मनोजकुमार लोहिया ( पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र ) प्रमुख उपस्थिती :- मा. श्री. सुदर्शन पाटील ( उपविभागीय पोलीस अधीक्षक खेड )
मा. श्री. मितेश घट्टे ( अतिरिक्त पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पोलीस )
श्री. विजयसिह चौव्हाण ( खेड पोलीस स्टेशन ) तसेच,
आयोजक :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खेड तालुका. यांच्या उपस्थिती मध्ये हा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम पार पडला.