
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी संभाजीनगर- शितल रमेश पंडोरे ———————————————–
संभाजीनगर:- हदगाव मनाठा ता.हदगाव. जि .नांदेड .16 डिसेंबर2022 रोजी . मनाठा गावातील दारूबंदी साठी महिला आक्रमक, मनाठा येथे 1 देशी दारू ,2 बियर बार,आणि 1 बियर शॉप आहेत. या दुकानाच्या शेजारी प्राथमिक शाळा आणि हिंदू समाज चे दैवत असलेले हनुमान मंदिर आहे. आणि काही अंतरावर प्राथमिक महाविद्यालया आहेत. येतील शाळे करी विद्यार्थी आणि महिला देव दर्शन साठी याच रस्त्यावरून ये जा करत असतात . मात्र त्यांना या दुकाना समोरील दारुड्यांचा त्रासाचा मोठा सामना करावा लागतो.
मनाठा येथील लोकवस्ती त दारुड्यांचा मोठा त्रास गावातील गरीब कुटुंब तील कमावते पुरुष आणि काही अल्पवयीन न तरुण दारू च्या व्यसनाधिन होत आहे. त्या मुळे घरोघरी भांडण लागून गोर गरिब च्या संसार चा उद्वस्त होत आहे.
तरी प्रशाषणाने आपल्या स्थरा वरून मनाठा ग्रामीण स्थानावरील मतदान घेऊन सदर वस्तीतले आणि परिसरातील दारू चे दुकान आणि बियर शॉप बंद करून त्यांचे परवाने रद्द करावे. तसेच 1हजार महिलांचे साक्षर असलेलं प्रशासनाला निवेदनात म्हंटले आहे. हा सर्व प्रकार थांबवण्यासाठी मनाठा गावातील महिलांनी पुढाकार घेतला. या सर्व गंभीर समस्या तक्रार जिल्हा अधिकारी नांदेड पोलीस स्टेशनमध्ये आणि तहसीलदार हदगाव आणि ग्रामपंचायत एका निवेदनाद्वारें केले आहे. निवेदनात प्रियांका गजानन पतंगे,आम्रपाली रावते, मंगल घोडगे,पुष्पा बाई सोनाळे, आशाबाई सोनाळे, विद्या नरवाडे, आणि इतर 1 हजार साक्षर आहेत.