
दैनिक चालू वार्ता मोखाडा प्रतिनीधी -सौरभ कामडी
मोहिते महाविद्यालय खोडाळा यांच्या श्रमसंस्कार शिबिरास श्री प्रदीप वाघ यांनी कोचाळे येथे भेट दिली यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की प्रत्येक विद्यार्थ्याने कठोर परिश्रम घेऊन अभ्यास केला पाहिजे शिवाय आपण स्वावलंबी शिक्षण घेतले पाहिजे,शेती किंवा जो व्यवसाय आपले आईवडील करतात त्यांना सहकार्य केले पाहिजे.हे सर्व करत असताना आपण सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे व सामाजिक कार्य करण्यासाठी श्रमसंस्कार शिबिराचा नक्कीच लाभ होईल असे मत श्री प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.
यावेळी श्री प्रदीप वाघ उपसभापती, श्री मंगेश दाते माजी सरपंच, श्री नंदकुमार वाघ उपसरपंच, श्री गणेश खादे ग्रामपंचायत सदस्य श्री अशोक वाघ, श्री विठ्ठल गोडे पोलिस पाटील, श्री गणेश वाघ पत्रकार, श्री संजय वाघ माजी सरपंच, श्री नरेंद्र येले सरपंच, श्री अंनता वारे ग्रामपंचायत सदस्य श्री रमेश बोटे उपाध्यक्ष, श्री भारत बुधर,
मोहिते महाविद्यालय चे सचिव श्री दिपक कडलग, तज्ञ मार्गदर्शक श्री वाघ सर, प्राध्यापक तुकाराम रोकडे सर, श्री नवनाथ शिंगवे
जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री दिनकर फसाळे, श्री राजा जोशी सर मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी श्री प्रदीप वाघ यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदान केलेल्या कामाची पाहणी केली.