दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनीधी- संभाजी पुरीगोसावी.
राज्यांतील भारतीय पोलीस सेवा दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या पुन्हा शनिवारी दुपारी राज्य शासनांने बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये नाशिक परिक्षेत्रांचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर पाटील यांची बदली करण्यात आली होती. तर त्यांच्या रिक्त जागेवर सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र शनिवारी दुपारी झालेल्या नव्या आदेशामध्ये सुनील फुलारी यांची कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक या पदावर नियुक्ती करण्यात आली. तर कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांची पिंपरी-चिंचवड सहा पोलीस आयुक्त या पदावर नियुक्ती करण्यांत आली. मनोजकुमार लोहिया यांचा कार्यकाळ कोल्हापूर विभागासाठी उत्कृंष्ट ठरला. त्यांनी कोल्हापूर परिक्षेत्रांतील पोलीस ठाण्यांच्या सक्षमीकरण्यासाठी त्यांनी चांगलाच भर दिला होता. सांगली जिल्ह्यातील भोंदू बाबांनी केलेल्या खून प्रकरणी उकल मनोजकुमार लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती. तसेच दोनच दिवसांपूर्वी त्यांचा सातारा जिल्ह्यांतील दौऱ्यामध्ये त्यांनी विविध पोलीस ठाण्यात भेट देवुन वार्षिक तपासणी सुरु केली होती. तर कोल्हापूर परिक्षेत्रांचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात नक्षलग्रस्त भागांतून केली तेथे त्यांनी नक्षलविरोधी अनेक कारवाया केल्या. आर्थिक गुन्ह्यांची उकल करण्यांत त्यांचा चांगलाच हातखंड होता. राज्यांतील पहिली सायबर क्राईम प्रयोगशाळा त्यांनी सुरु केली होती. त्यांनी सांगली नागपूर मुंबई नाशिक या जिल्ह्यांमध्ये विविध पदावर शांत आणि शिस्तप्रिय आपली पोलीस प्रशासनांमध्ये सेवा बजवली. त्यांनी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणूनही काम पाहिले होते. त्यामुळे कोल्हापूर परिक्षांचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून सुनील फुलारी यांना कोल्हापूर विभागांची चांगलीच माहिती आहे.
