दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
नांदेड – लोहा तालुक्यातील सायाळ येथील प्रगतिशील शेतकरी रत्नाकर पाटील ढगे यांना नुकताच नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत डॉ शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे.
नांदेड जिल्ह्यात सोशल मीडिया प्रत्यक्ष किंवा थेट बांधावरून नांदेड आकाशवाणीच्या माध्यमातून अनेक वेळेस शेती विषयक मार्गदर्शन व चर्चासत्र , विविध शेती अवजारे , बी-बीयाणे , खते , सेंद्रिय शेती याविषयीची सतत माहिती आपल्या ग्रुपच्या माध्यमातून व शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन देत असतात त्यांच्या या कार्याची दखल घेत नांदेड जिल्हा परिषदेने २०११-२२ चा डॉ शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे .
या पुरस्कार सोहळ्याचे वितरण दक्षिण भारतातील भरणारी सुप्रसिद्ध माळेगांव याञा येथे दिनांक २२-१२ -२०२२ रोजी कृषी प्रदर्शन या भव्य दिव्य कार्यक्रमात केले आहे . सदरील कार्यक्रमात त्यांचा पुरस्कार देऊन सहपत्नीक सम्मान केला जाणार आहे.
शेतकरीपुञ रत्नाकर पा ढगे यांना मिळालेल्या डॉ शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्काराबद्दल त्यांना तालुक्याभरसह जिल्ह्याभरातुन शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे
