
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर :आज प्रा.मुबिन सर यांच्या पॉवर ऑफ कॉन्फिडन्स अकॅडमी ची दहावी ची माजी विद्यार्थीनी कु.वैष्णवी संजीव रोयलावार ने रचला एक नविन इतिहास वैष्णवी यांचे MBBS साठी मुंबई येथील लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज ला प्रवेश मिळाले आहे.या निमित्ताने अकॅडमी चें संचालक प्रा.मुबिन सर यांनी पालकवर्ग सहित विद्यार्थीनींचे शाल हार व भेटवस्तू देऊन त्यांचे सत्कार केले व या सत्कार निमित्त मुबिन सरांनी प्रेरणादायी मार्गदर्शन पर भाषण केले आणि आपल्या भाषणात ते असे म्हणाले की भविष्यात देखील ती असेच यश दिवसेंदिवस प्राप्त करत राहो व तसेच आणखी आपले संघर्ष वाढवून उंच भरारी घ्यावे यशस्वी डॉक्टर बनून आपलं आपल्या आई वडिलांचे व सर्व गुरुजणांचे खुप नाव मिळवावे.वैष्णवी ही मुळात फार मेहनती,ज्ञानी,क्रियाशील,संयमी,जिद्दी विद्यार्थीनी राहिलेली आहे.ती आपल्या शालेय जीवनापासूनच विविध स्तरावरील सर्व स्पर्धा परीक्षा मध्ये ती प्रथम क्रमांक प्राप्त करत आलेली आहे.आणि तेंव्हा पासूनच ती डॉक्टर बनण्याचे स्वप्न ठेवत आली होती.त्या अनुषंगाने ती आपलं अभ्यास ही सुरु ठेवली.रात्रंदिवस फार मेहनत करत राहिली आणि आज ती आपल्या मनोगत मध्ये म्हणाली की मुबिन सरांचे सुद्धा या यशामध्ये वाटा आहे आणि त्यांनी मला बोलण्याचे धाडस दिले आणि कितीही अपयश आले तरी खचून जायचे नसते असे ते वारंवार मला सांगायचे मला सराकडून नेहमी प्रेरणा मिळाली आहे असे ती आपले मत व्यक्त केली या सत्कार बद्दल सरांचे आभार ही व्यक्त केली.आणि विशेष म्हणजे पालक संजीव रोयलावार यांनी सुद्धा आपल्या मनोगतात सरांचे आभार मानले व म्हणाले की मुबिन सर हे नेहमी माझा आत्मविश्वास वाढवायचे त्यांनी माझा आत्मविश्वास कधी ढासळू दिले नाही आणि आज आमच्या या यशाचे सर्व श्रेय मुबिन सरांना जाते असे ते म्हणाले या मध्ये सर्वात महत्वाची भूमिका हे त्याचे पालक संजीव रोयालावार यांनी अथक परिश्रम करून आपले प्रयत्न करत राहिले आणि यामध्ये त्याचा सर्वात मोठा वाटा आहे.म्हणूनच आज अकॅडमीत मुबिन सर यांनी पालक संजीव रोयलावार यांचे शाल,हार द्वारे विशेष सत्कार करण्यात आले.यावेळी कार्यक्रमच्या ठिकाणी मुबिन सरांच्या डी.एड.प्रथम वर्षचे शिकवणी वर्गांचे विद्यार्थीनीं उपस्थित होते.